नवी दिल्ली - या वर्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत कठोर निर्णय घेतल्यानंतर भारतीय कंपन्या पुन्हा 'टॅलेंट'मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत.
एका नवीन सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, 87 टक्के कंपन्यांनी 2021 मध्ये कर्मचार्यांचे पगार वाढवण्याची योजना आखली आहे. तर, 2020 मध्ये 71 टक्के कंपन्यांनी असा विचार केला होता.
यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या एओनच्या सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांपैकी 87 टक्के कंपन्यांनी सांगितले की, पुढील वर्षी पगार वाढविला जाईल आणि 61 टक्के कंपन्यांनी असे म्हटले की ते 5-10 टक्क्यांच्या दरम्यान पगार वाढवतील. एओन ही जागतिक व्यावसायिक सेवा कंपनी आहे.
हेही वाचा - कोरोनाचे संकट: कुटुंब चालविण्याकरता ४६ टक्के भारतीयांची मित्रासंह नातेवाईंकाकडे उधारी
एओनचे भागीदार नितीन सेठी म्हणाले, 'कोविड -19 च्या साथीच्या रोगाची लागण आणि अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम झाल्यानंतरही भारतातील संघटनांनी प्रचंड लवचिकता आणि परिपक्व दृष्टीकोन दर्शविला आहे. 2020 च्या दुसर्या आणि तिसर्या तिमाहीत कंपन्यांनी कठोर निर्णय घेतले. ग्राहकांची मागणी सुधारत असल्याने आता कंपन्या प्रतिभेवर गुंतवणूक करण्यास तयार आहेत.'
अहवालात म्हटले आहे की, सर्वाधिक वेतनवाढ करणाऱ्यांमध्ये हायटेक, माहिती तंत्रज्ञान (आयटी), आयटी सक्षम सेवा (आयटीईएस), जीवन विज्ञान, ई-कॉमर्स आणि व्यावसायिक सेवांचा समावेश आहे.
या अभ्यासात 20 हून अधिक उद्योगांमधील 1,050 कंपन्यांच्या डेटाचे विश्लेषण केले गेले.
हेही वाचा - हॅकर्सनी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी केला 100 हाय-प्रोफाइल लोकांवर हल्ला - मायक्रोसॉफ्ट