ETV Bharat / business

कौतुकास्पद! आयआयटी दिल्लीकडून कोरोना वॉरिअरसाठी 'कवच'; जाणून घ्या किंमत - Department of Textile and Fibre Engineering

कवच हा मास्क ईटीईएक्स स्टार्टअपने तयार केला आहे. यामध्ये एन-९५ प्रमाणे फिटिंग आणि इंजिनिअरिंग फिल्टरेशन आहे. त्यामुळे ३ मायक्रॉन आकाराचे सूक्ष्म घटक मास्कमधून फिल्टर होवू शकतात.

कवच मास्क
कवच मास्क
author img

By

Published : Apr 19, 2020, 9:37 AM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात एन-९५ मास्कचा तुटवडा जाणवत आहे. या संकटात दिलासा देणारी कामगिरी आयआयटी दिल्लीच्या स्टार्टअपने केली आहे. या स्टार्टअपने एन-९५ प्रमाणे सुरक्षित असलेला 'कवच' हा मास्क केवळ ४५ रुपयात उपलब्ध केला आहे.

आयआयटी दिल्लीच्या माहितीप्रमाणे 'कवच' हा मास्क एन-९५ एवढाच प्रभावी आहे. देशात एन-९५ ची किंमत जास्त आहे. त्यामुळे अधिकतर लोकांना एन-९५ ची किंमत परवडत नाही. कवच हा मास्क ईटीईएक्स स्टार्टअपने तयार केला आहे. यामध्ये एन-९५ प्रमाणे फिटिंग आणि इंजिनिअरिंग फिल्टरेशन आहे. त्यामुळे ३ मायक्रॉन आकाराचे सूक्ष्म घटक मास्कमधून फिल्टर होवू शकतात. जास्तीत जास्त लोकांना कोरोनापासून संरक्षण करता यावे, यासाठी मास्कची किंमत कमी ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा-बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांची पीएम केअर्सला ५ कोटींचे योगदान

टेक्सटाईल आणि फायबर इंजिनिअरिंग विभागाने तांत्रिक दिल्यामुळे मास्कची कार्यक्षमता वाढल्याचे आयआयटी दिल्लीने म्हटले आहे. या विभागाचे प्राध्यापक विपीन कुमार म्हणाले, एकदा वापर केलेल्या पीपीईचे विघटन करणे, अशी विविध आव्हाने देशापुढे आहेत. कवच हा मास्क म्हणजे स्वदेशी उत्पादनाच्या क्षमता दाखविणारे उत्पादन आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या संकटात संधी शोधणाऱ्या चीनला बसणार पायबंद; सरकारने काढले हे आदेश

मास्क धुता येईल व १० वेळा वापर होवू शकणारा मास्क तयार करण्यावर स्टार्टअपची टीम काम करत असल्याची त्यांनी माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.