ETV Bharat / business

कोरोनाची चाचणी होणार स्वस्त; आयसीएमआरने 'हा' घेतला निर्णय

देशात काही कंपन्यांकडून कोरोना चाचणीचे किट्स तयार करण्यात आले आहेत. कोरोना चाचणी किट्सची बाजारपेठ खुली असून त्यामध्ये खूप स्पर्धा आहे. त्यामुळे कमी किमतीत कोरोनाच्या चाचणी होवू शकतात, असे आयसीएमआरने राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : May 27, 2020, 3:06 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात राज्यांचा आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदने (आयसीएमआर) कोरोनाच्या चाचणीसाठी ४ हजार ५०० रुपयांची मर्यादा काढून टाकली आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचणीचा खर्च कमी होणार आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी किती किमान किंमत ठेवायची, हा अधिकार आयसीएमआरने राज्यांना दिला आहे.

देशात काही कंपन्यांकडून कोरोना चाचणीचे किट्स तयार करण्यात आले आहेत. कोरोना चाचणी किट्सची बाजारपेठ खुली असून त्यामध्ये खूप स्पर्धा आहे. त्यामुळे कमी किमतीत कोरोनाच्या चाचणी होवू शकतात, असे आयसीएमआरने राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा-ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नव्हे 'जाळे'; टाळेबंदीतही ग्राहकांची होतेय फसवणूक

कोरोनाच्या चाचणी किट्सचा देशात स्थिर पुरवठा आहे. राज्यांना या किट्सची खरेदी करता येणार आहेत. अशा बदलामुळे किट्सच्या किमतीवरील ४, ५०० रुपयाची मर्यादा काढून टाकल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. यापूर्वी आयसीएमआरने कोरोना किट्सची किंमत वाढवू नये, यासाठी ही मर्यादा १७ मार्च २०२० ला निश्चित केली होती.

हेही वाचा-विमान प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

दरम्यान, आयसीएमआरच्या पत्रानुसार देशात कोरोनाची चाचणी करणाऱ्या ४२८ सरकारी लॅब आहेत. तर खासगी १८२ लॅब आहेत. देशामध्ये ३५ कंपन्यांच्या कोरोना किट्सला आयसीएमआरने मान्यता दिली आहे. त्यामध्ये स्वदेशी आणि विदेशी किट्सचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.