ETV Bharat / business

आयसीआयसीआय बँकेच्या नेट बँकिंगमध्ये अडथळा; ग्राहकांना मन:स्ताप

author img

By

Published : Jul 15, 2021, 3:08 PM IST

. काही वापरकर्त्यांना इंटरनेट बँकिंग करताना अडथळा येऊ शकतो. त्यामुळे काही वेळाने लॉग इन करावे, असे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे

आयसीआयसीआय  नेट बँकिंग
आयसीआयसीआय नेट बँकिंग

हैदराबाद - आयसीआयसीआय बँकेच्या ऑनलाईन बँकिंग सेवेत अडथळा आल्याचा काही वापरकर्त्यांना गुरुवारी अनुभव आला. सेवेत अडथळा येत असल्याचे लक्षात येताच बँकेने वेबसाईटवर तशा स्वरुपाची माहिती दिली .

आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर बँकेने सेवेतील अडथळ्याची माहिती दिली. काही वापरकर्त्यांना इंटरनेट बँकिंग करताना अडथळा येऊ शकतो. त्यामुळे काही वेळाने लॉग इन करावे, असे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे. दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेत ग्राहकांना कोणताही अडथळा जाणवला नव्हता.

हेही वाचा-लर्निंग सोबत अर्निंग देखील महत्वाचे - पंतप्रधान मोदी

यापूर्वी 4 जानेवारी 2021 आणि 16 ऑक्टोबर 2020 रोजी आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना नेट बँकिंग सेवा घेताना अडथळा आला होता.

हेही वाचा-स्वता:चेच तोंड शिवल्याचं केलं नाटक; पत्नीविरोधात रचलेला कट उलटला

दरम्यान, देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाकडून यापूर्वी अनेकदा रविवारी काही काळ डिजीटल सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामागे डिजीटल सेवांमधील त्रुटी दूर करणे व यंत्रणांची देखभाल करणे हा उद्देश होता. कोरोनाच्या काळात बँक ग्राहकांकडून इंटरनेट बँकिंग, डिजीटल पेमेंट अॅपच्या वापराचे प्रमाण वाढले आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.