ETV Bharat / business

कोरोनाचा धसक्याने आईस्क्रीमचा व्यवसाय 'थंड'; अमुललाही फटका - Amul Ice cream business in lockdown

आईस्क्रीमच्या व्यवसायात वर्षभरात सुमारे 4,500 कोटी रुपयांचा उलाढाल होते. मात्र, कोरोनाच्या संकटाने हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. पहिल्या तिमाहीत आईस्क्रीमच्या व्यवसायात जवळपास 50 टक्के घसरण होईल, असा दुग्धजन्य उत्पादनात आघाडीवर असलेल्या अमुलचा अंदाज आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Jun 27, 2020, 7:40 PM IST

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटामुळे आईस्क्रीमच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. आईस्क्रीमच्या व्यवसायात 40 टक्के घसरण झाली आहे. पावसाळा सुरू झाल्याने आईस्क्रीम व्यवसाय आर्थिक संकटातून सावरण्यास आणखी काळ लागणार आहे. कारण दरवर्षी पावसाळ्यात आईस्क्रीमची मागणी कमी झालेली असते.

आईस्क्रीमच्या व्यवसायात वर्षभरात सुमारे 4,500 कोटी रुपयांचा उलाढाल होते. मात्र, कोरोनाच्या संकटाने हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. पहिल्या तिमाहीत आईस्क्रीमच्या व्यवसायात जवळपास 50 टक्के घसरण होईल, असा दुग्धजन्य उत्पादनात आघाडीवर असलेल्या अमुलचा अंदाज आहे. आर्थिक वर्षाच्या तिमाहीत दरवर्षी आईस्क्रीमच्या विक्रीत वाढ होत असते. मात्र, यंदा घसरण झाली आहे. इतर कंपन्यांच्या व्यवसायात 70 ते 80 टक्के घसरण झाली असल्याची शक्यता गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (जीसीएमएमएफ) व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर. एस. सोधी यांनी सांगितले. मार्चमध्ये 95 टक्के, एप्रिलमध्ये 55 टक्के, तर मे महिन्यात आईस्क्रीमच्या व्यवसायात 70 टक्के घसरण झाल्याचे सोधी यांनी सांगितले.

लग्न अथवा इतर कार्यक्रमासाठी होणारी आईस्क्रीमची मागणी कमी झाली आहे. कारण असे कार्यक्रम कमी होत आहेत. जूनमध्येही आईस्क्रीमची विक्री 30 टक्क्यांहून वाढणार नाही, असा त्यांनी अंदाज केला. आईस्क्रीममुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले नाही. मात्र, थंड पदार्थ खाल्ल्ल्यामुळे सर्दी होण्याच्या शक्यतेने ग्राहकांनी आईस्क्रीमला टाळल्याचे दिसून आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.