ETV Bharat / business

'५ जी' तंत्रज्ञानाची चाहूल: हुवाईचा देशात पहिल्यांदाच नेटवर्कमध्ये कृत्रिम मानव बुद्धिमत्तेचा वापर

सातत्याने भविष्यवेधी, नेटवर्कची क्षमता वाढविणाऱ्या नव्या पिढीतील तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे व्होडाफोन आयडियाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी विशांत व्होरा यांनी सांगितले.

संग्रहित - हुवाई
author img

By

Published : Oct 15, 2019, 5:49 PM IST

नवी दिल्ली - चिनी दूरसंचार कंपनी हुवाईने व्होडाफोन आयडिया नेटवर्कमध्ये कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान ५ जीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

सातत्याने भविष्यवेधी, नेटवर्कची क्षमता वाढविणाऱ्या नव्या पिढीतील तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे व्होडाफोन आयडियाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी विशांत व्होरा यांनी सांगितले. डिजिटल युगासाठी कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापरकर्त्यांसाठी चांगला अनुभव ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हुवाई इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय चेन यांनी व्होडाफोन आयडियाबरोबर भागीदारी करताना आनंद होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ते ५ जीच्या भविष्यासाठी तयार होत असल्याचेही चेन यांनी म्हटले.

हेही वाचा-गुणवत्तेच्या आधारे आम्हाला पारखा ; हुवाईचा भारताला सल्ला

व्होडाफोन आयडिया नेटवर्क हे देशातील सर्वात मोठे आणि एमएमआयओचे तंत्रज्ञान वापरणारे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे नेटवर्क आहे.

सरकार हुवाईला '५ जी'मध्ये सहभागी करण्याबाबत साशंक

चीनची दूरसंचार कंपनी हुवाईचा ५ जीमध्ये समावेश करताना योग्य विचार करायला हवा, असे मत राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक ले. जनरल राजेश पंत यांनी सप्टेंबरमध्ये व्यक्त केले. ५ जी हे केवळ दूरसंचार नेटवर्क नाही, तर यामुळे संपूर्ण क्षेत्रांवर याचा परिणाम होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशात यंदा ५ जीसाठी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये केंद्रीय दूरसंचार विभाग हुवाईला सहभागी करून घेण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

हेही वाचा-'हुवाईचा ५ जी मध्ये समावेश करताना योग्य विचार करायला हवा'

Intro:Body:

Dummy_business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.