मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेवरील तात्पुरते निर्बंध हटतील, अशी आशा असल्याचे येस बँकेचे नवनियुक्त प्रशासक प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने येस बँकेसाठी तयार केलेल्या नियोजनाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतिम मजुरी देईल, असेही प्रशांत कुमार यांनी स्पष्ट केले.
येस बँकेचे प्रशासक प्रशांत कुमार म्हणाले, भांडवल उभे करण्याच्या नियोजनाशी बँकेचे निर्बंध हटण्याचा संबध असणार नाही. येस बँक ही आणखी भांडवलासाठी प्रयत्न करणार आहे. त्याला सर्वात अधिक प्राधान्य असणार आहे. त्याचबरोबर ठेवीदारांचा विश्वास पूर्ववत होण्याला प्राधान्य असणार आहे.
संबंधित बातमी वाचा-येस बँक प्रकरण : सीबीआयकडून मुंबईत 7 ठिकाणी छापे
दरम्यान, येस बँकेत सुमारे २,०९ लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. येस बँकेचे भांडवल अपुरे असल्याने आरबीआयने मागील गुरुवारपासून तात्पुरते निर्बंध (मोरॅटेरियम) लागू केले आहेत. येस बँकेच्या संचालकांच्याजागी प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून आरबीआयने नियुक्ती केली आहे. प्रशांत कुमार हे स्टेट बँकेचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी होते.
संबंधित बातमी वाचा-येस बँकेच्या संस्थापकाकडून ४,३०० कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग - ईडी