नवी दिल्ली - जर तुम्ही आधार कार्ड हे पॅन कार्डला जोडले (लिंक) केले नाही तर तुम्हाला 10 हजार रुपयापर्यंत आर्थिक फटका बसू शकतो. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या निर्देशानुसार (सीबीडीटी) सर्व पॅन कार्ड हे आधार कार्डाशी जोडावे लागणार आहेत. त्यासाठी आज शेवटची मुदत आहे.
जर आधार हे पॅन कार्डला जोडले नाही तर पॅन हे चालू नसल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. तसेच टीडीएसच्या दरावरही परिणाम होणार असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. पॅन कार्ड हे आधार कार्डला जोडले नसल्याने आयटीआर भरता येणार आहे. त्यामुळे 10 हजारांचा दंड भरावा लागू शकतो.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्न प्रक्रिया क्षेत्राकरता पीएलआय योजनेला मंजुरी
- आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटीआर भरण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. तसेच 80 सी आणि 80 डीमधील गुंतवणुकीवर परतावा भरण्यासाठी माहिती देण्याकरताही आज शेवटची तारीख आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत दंडाशिवाय टीडीएस रिटर्न्स भरण्यासाठीही आज शेवटची तारीख आहे.
- नवीन आर्थिक वर्षात 1 जुलैपासून 50 लाखांहून अधिक खरेदी असेल तर 0.1 टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे. मात्र, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 10 कोटीहून अधिक उलाढाल असेल तरच हा टीडीएस द्यावा लागणार आहे. धर्मादाय संस्था व विश्वस्त संस्थांना वर्ष 2021-22 मध्ये प्राप्तिकर विभागात पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. ज्या व्यक्तींची आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये उलाढाल 10 लाख कोटींहून कमी आहे, त्यांना प्राप्तीकराचे लेखापरीक्षण करण्याची गरज नाही.
हेही वाचा-आरबीआयकडून स्वयंचलित आवर्ती देयकांचे पालन करण्याकरता सहा महिन्यांची मुदतवाढ
अशी करा पॅनची आधारला जोडणी
- 567678 किंवा 56161 या क्रमांकावर UIDPAN<स्पेस>12 अंकी आधार क्रमांक><स्पेस>10 अंकी पॅन क्रमांक> असा संदेश पाठवा.
- www.incometaxindiaefiling.gov.in. या ई-फायलिंग वेबसाईटवरूनही जोडणी करू शकता.
करदात्यांना पॅनकार्ड हे आधारला जोडण्याशिवाय पर्याय नाही-
जर आधारला पॅन कार्ड जोडणी नसेल तर, पॅन कार्ड सुरू राहणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने गतवर्षी मार्चमध्ये स्पष्ट केले आहे. पॅन आणि आणि आधार जोडणी करणे बंधनकारक आहे. हे तुम्ही बायोमेट्रिक आधार पडताळणीनेही करू शकता. तसेच एनएसडीएल आणि युटीआयटीएसएलच्या पॅन सेवा केंद्रातूनही जोडणी करणे शक्य आहे. अशी जोडणी भविष्यासाठी फायद्याचे असल्याचेही प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर परताव्यासाठी पॅनकार्ड हे आधारला जोडण्यासाठी बंधनकारक असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे करदात्यांना पॅनकार्ड हे आधारला जोडण्याशिवाय पर्याय नाही.