मुंबई - आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलजीसच्या रोशनी नाडार मल्होत्रा या देशातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५४ हजार ८५० कोटी रुपये आहे. त्यांच्यापाठोपाठ बायकॉनच्या किरण मुजूमदार-शॉ यांची ३६,६०० कोटी रुपये संपत्ती आहे.
देशातील सर्वात श्रीमंत १०० महिलांपैकी ३१ महिलांची संपत्ती ही कमीत कमी १०० कोटी रुपये आहे. ही यादी हरुण इंडिया आणि कोटक हेल्थने प्रसिद्ध केली आहे. या यादीतील महिला आत्मनिर्भर असून सहा व्यावसायिक आणि २५ आंत्रेप्रेन्युअर आहेत.
हेही वाचा-देशांतर्गत ८० टक्के विमान वाहतूक सेवा देण्याची कंपन्यांना केंद्राकडून परवानगी
- झोहोच्या राधा वेंबू यांची संपत्ती ११,९५० कोटी रुपयांहून अधिक आहे.
- अरिस्टा नेटवर्कच्या जयश्री उल्लाल यांची संपत्ती १०,२२० कोटी रुपये आहे.
- शॉ, उल्लाल आणि वेंम्बु यांचा हरुणच्या जागतिक श्रीमंताच्या यादीतही समावेश आहे.
- न्याकाजच्या फाल्गुनी नायर यांची मालमत्ता ५ हजार ४१० कोटी रुपयांची आहे.
- बाईजुसची मालकी असलेल्या ३४ वर्षांच्या दिव्या गोकुळनाथ यांची संपत्ती ३,४९० कोटी रुपयांची आहे.
रिलायन्सने इंडस्ट्रीजचा '२०२० फोर्च्युन इंडिया ५००' यादीत पहिला क्रमांक
अर्थव्यवस्था मंदावली असताना रिलायन्सने इंडस्ट्रीजने '२०२० फोर्च्युन इंडिया ५००' यादीत पहिला क्रमांक पटकाविण्यात यश मिळविले आहे.फोर्च्युन इंडियाने सार्वजनिक बँक इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला (आयओसी) या यादीत पहिल्यांदाच मागे टाकले आहे. गतवर्षी आयओसी यादीत प्रथम होती.