नवी दिल्ली - कोरोनाच्या लढ्यासाठी विविध संस्था आणि कंपन्या तंत्रज्ञानाचा वापर करून योगदान देत आहेत. यात आणखी एक मोलाची भर पडली आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या पीपीईची निर्मिती करण्यात हरियाणातील वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईनला यश आले आहे. या पीपीईचे याच आठवड्यात उत्पादन घेण्यात येणार आहे.
हरियाणातील विद्यापीठाने तयार केलेल्या पीपीईची चेन्नईमधील रुग्णालयात दुसऱ्या फेरीत चाचणी घेण्यात येत आहे. त्यानंतर पीपीईचे याच आठवड्यात उत्पादन घेण्यात येणार असल्याचे वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईनचे कुलगुरू संजय गुप्ता यांनी सांगितले. हे पीपीई आयआयटी दिल्ली, एआयआयएमएस, वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईन आणि चेन्नईच्या टेक्स्टाईल मिल्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा-राज्यांना कर हिश्याची 'इतके; कोटी केंद्राकडून मिळणार, जाणून घ्या महाराष्ट्राला किती?
पीपीईची रचना आणि उत्पादन हे सर्वांसाठी खुले तंत्रज्ञान ठेवले आहे. त्यामुळे कोणताही लहान अथवा मध्यम कारखाना आमच्याकडून त्याचे डिझाईन घेत उत्पादन सुरू करू शकतो, असे गुप्ता यांनी सांगितले. वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईन हे खासगी विद्यापीठ आहे. पीपीई किटमध्ये गॉगल, फेसचे कव्हर, मास्क, हातमोजे, गाऊन, बुट आणि डोक्याला कव्हर यांचा समावेश आहे.
हेही वाचा-'या' राज्यातील रेशन दुकानात मिळणार मास्क