बंगळुरू – सीमारेषेवर तणावाची स्थिती असताना हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) कंपनीने उच्च भागात काम करू शकणारे कमी वजनाचे दोन लढाऊ हेलिकॉप्टर (एलसीएच) तयार केली आहेत. ही लढाऊ हेलिकॉप्टर अत्यंच उंच भाग असलेल्या लेह येथे तैनात करण्यात आली आहेत. ही लढाऊ हेलकॉप्टर उंच भागात हल्ला करू शकणारे जगातील सर्वात हलके हेलिकॉप्टर आहेत.
सुरक्षा दलाला लागणारी विशेष गरज लक्षात घेवून एलसीएचची खास निर्मिती केल्याचे कंपनीचे सीएमडी आर. माधवन यांनी सांगितले. एचएएलने आत्मनिर्भर अभियानात मोलाची कामगिरी बजाविल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
एलसीएचची उंच भागात नुकतेच चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल हरजीस सिंग अरोरा व विग कमांडर (निवृत्त) सुभाष पी. जॉन यांनी सहभाग घेतला. अत्यंत प्रतिकूल तापमान आणि अत्यंत उंच भागात हे लढाऊ हेलकॉप्टर शत्रूवर सक्षमपणे हल्ला करू शकते.
एलसीएच उंच भागात लढण्यासाठी उत्तम हेलिकॉप्टर-
- एलसीएच हे शस्त्रास्त्रांठी चांगले माध्यम आहे. यामधून शस्त्रास्त्रांच्या मदतीने दिवसा अथवा रात्री अचूकपणे लक्ष्यभेद करता येणे शक्य आहे.
- उंचावरील भागात शस्त्रास्त्रेही वाहून नेण्याची हेलिकॉप्टरची क्षमता आहे. त्यामुळे हे कमी वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर अत्यंत उंच भागात काम करण्यासाठी सर्वात योग्य आहेत.
हवाई दल आणि सैन्यदलाला एकूण 160 एलसीएच लागणार आहेत. संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने पहिल्या टप्प्यात 15 एलसीएचची खरेदी करण्याची मंजुरी दिली आहे.
दरम्यान, पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर तणावाची स्थिती असताना उंच पर्वतरांगांमधून प्रत्युत्तर देण्याची सैन्यदलाने तयारी सुरू केली आहे. नुकतेच शत्रुची धडकी भरविणारी राफेल ही लढाऊ विमाने हवाई दलात दाखल झाली आहेत.