नवी दिल्ली - ट्विट बंद करण्याचा निर्णय घेतलेल्या नायजेरिया सरकारने भारतीय अॅप कूचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. नायजेरिया सरकारने कार्यालयून खाते कूवर खोलले आहे. गेल्या आठवड्यात नायजेरिया सरकारने अमेरिकन कंपनी ट्विटरवर बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
कूचे सहसंस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्णन यांनी कू या मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी नायजेरिया सरकारच्या ऑफिस हँडलचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही माहिती ट्विटरवरही शेअर केली आहे. कूइंडियावर नायजेरिया सरकारचे मनापासून स्वागत. भारतापलीकडे कंपनी भरारी घेत आहे. कूमध्ये नायजेरियाच्या स्थानिक भाषांचाही समावेश करण्यात येणार आहे. कंपनीकडून स्थानिक नियमांचे पालन केले जाणार असल्याचेही कंपनीचे सीईओ राधाकृष्णन यांनी म्हटले होते.
हेही वाचा-कोरोना लशींसह औषधावरील जीएसटी दराबाबत १२ जूनला जीएसटी परिषदेची बैठक
कू सोशल मीडियाचे 60 लाखांहून अधिक वापरकर्ते-
केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन डिजीटल कायद्याची अंमलबजावणी सर्वप्रथम कू कंपनी दाखविली होती. कू ही सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये 60 लाखांहून अधिक वापरकर्ते आहे. नुकतेच टायर ग्लोबल कंपनीने कूमध्ये 218 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा-टाटाचा डिजीटल इकोसिस्टिममध्ये विस्तार; 1एमजीमध्ये मोठा हिस्सा खरेदी
यामुळे नायजेरियामध्ये ट्विटर बंद
नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मुहम्माडू बुहारी यांनी ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचे ट्विट कंपनीने काढून ठेवले होते. त्यानंतर नायजेरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्विटरवर देशामध्ये बंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता.