नवी दिल्ली - कोरोनाशी लढ्यात आघाडीवर असलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नर्स, तंत्रज्ञ, पोलीस इत्यादीसाठी सरकारने आयगॉट हे डिजीटल पोर्टल लाँच केले आहे. यामध्ये विविध कोर्स देण्यात आले आहेत. त्यामधून कोर्स करणाऱ्यांना सखोल माहिती व मागर्दर्शन मिळू शकणार आहे.
इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग (आयगॉट) मध्ये कोरोनाशी निगडित व्हिडिओ, संसर्ग टाळण्यासाठी उपाय, पीपीईचा कसा वापर करावा, कोरोना रुग्णाचे व्यवस्थापन आदींचे कोर्स आहेत. एवढेच नव्हे तर अतिदक्षता, कोरोनाच्या चाचणीकरता नमुने घेणे, व्हेटिंलेटर व्यवस्थापन आदींचाही समावेश आहे.
कोरोनाच्या लढ्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या गटाचे प्रमुख अरुण कुमार पांडा यांनी राज्य व केंद्र सरकारच्या सर्व मुख्य सचिवांना पत्र लिहून तातडीने मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्याची सूचना केली आहे.
हेही वाचा-टाळेबंदीचा परिणाम : गोएअरच्या ५,५०० कर्मचाऱ्यांना ३ मेपर्यंत विनावेतन सुट्टी
या (https://diksha.gov.in/igot) पोर्टलमधून कोरोनाशी निगडीत असलेल्या मनुष्यबळाशी निगडीत डाटाचे संकलन करण्यात आले आहे. यामध्ये आयुष डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवकांचे मनुष्यबळ आदींचा समावेश आहे. हा डाटा पोर्टलच्या डॅशबोर्डरून जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणे शक्य होणार आहेत. त्यामधून नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने मनुष्यबळाचे समन्वय साधणे शक्य होणार आहे.
हेही वाचा-टाळेबंदी-२ : उद्यापासून कोणत्या कामांना देण्यात येणार आहे परवानगी?, घ्या जाणून