नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांना योग्य किमतीत सॅनिटायझर खरेदी करता यावेत, यासाठी सरकारने त्याची जास्तीत जास्त किंमत (एमआरपी) निश्चित केली आहे. सॅनिटायझरची प्रति २०० मिलीसाठी जास्तीत जास्त १०० रुपये ग्राहकांना द्यावे लागणार आहेत.
दोनस्तरीय मास्कसाठी जास्तीत जास्त ८ रुपये आणि तीनस्तरीय मास्कसाठी १० रुपये किंमत निश्चित केली आहे. या किमती ३० जूनपर्यंत ठरवण्यात आल्या आहेत. ही माहिती ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी दिली आहे.
हेही वाचा-कोरोना परिणाम : दुकाने, मॉल बंद झाल्याने ऑनलाईन खरेदीचे वाढले प्रमाण
नुकतेच सरकारने सॅनिटायझर आणि मास्क यांचा जीवनावश्यक वस्तूंत समावेश केला आहे. या वस्तुंचा काळाबाजार होवू नये आणि त्याच्या किमती वाढवू नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सॅनिटायझरसाठी लागणाऱ्या अल्कोहलच्या किमतीवर १९ मार्चला मर्यादा घालून दिली आहे.
हेही वाचा-कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करा, सरकारच्या उद्योगांना सूचना