नवी दिल्ली - केंद्र सरकारने दुग्धोत्पादन क्षेत्राकरिता ४,५५८ कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. या योजनेमधून दुग्धोत्पदन क्षेत्राला चालना देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. त्याचा ९५ लाख शेतकऱ्यांना फायदा होवू शकणार आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, दुग्धोत्पादनासाठीची योजना ही श्वेत क्रांतीला पुढच्या टप्प्यात नेणार आहे. व्याज अनुदान योजनेतील लाभ २ टक्क्यांवरून २.५ टक्के करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. हे दोन्ही निर्णय शेतकरीवर्गाला लाभ देण्यासाठी घेण्यात आल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
हेही वाचा-फेसबुकची 'या' शैक्षणिक स्टार्टअप मध्ये ११ कोटी डॉलरची गुंतवणूक