ETV Bharat / business

केंद्र सरकारकडून नव्या २, ६३६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनला मंजुरी; महाराष्ट्रात सर्वाधिक!

नवीन चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर निवडक शहरांमध्ये ४ किलोमीटरच्या टप्प्यात कमीत कमी एक स्टेशन असेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादकांचा विश्वास वाढेल.  तसेच त्यांना नवीन इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल

Electric charging stations
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन
author img

By

Published : Jan 3, 2020, 5:44 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने देशातील २४ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील ६२ शहरात नवी २ हजार ६३६ चार्जिंग स्टेशन सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही मंजुरी फेम इंडियांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढविण्याकरता प्रोत्साहन होण्यासाठी देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

केंद्रीय अवजड मंत्रालयाने फेम इंडिया योजनेंतर्गत (टप्पा २) विविध शहरात चार्चिंग स्टेशन सुरू करण्यासाठी इच्छुकांच्या निविदा मागविल्या होत्या. याबाबत माहिती देताना प्रकाश जावडेकर म्हणाले, नवीन चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर निवडक शहरांमध्ये ४ किलोमीटरच्या टप्प्यात कमीत कमी एक स्टेशन असेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादकांचा विश्वास वाढेल. तसेच त्यांना नवीन इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. सध्या, चार्जिंगची पायाभूत सुविधा नसल्याने त्यांना चिंता वाटत होती, असेही प्रकाश जावडेकर म्हणाले. महाराष्ट्रात ३१७ चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत.

हेही वाचा-टाटा-मिस्त्री प्रकरण : कंपनी निबंधकांच्या याचिकेवरील एनसीएलएटीचा निकाल राखीव

काय आहे फेम इंडिया योजना?
फेम इंडिया (फास्टर अॅडोप्शन अँड मॅन्युफॅक्च्युअरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हिक्लस इन इंडिया) ही केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन आणि वापर वाढविण्यासाठी योजना सुरू केली आहे. यामध्ये देशातील विविध शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची मंजुरी दिलेल्या संस्थांना टप्प्याटप्प्यात मंजुरीचे पत्रे दिली जाणार आहेत. या पत्रासाठी संबंधित शहराची महापालिका, विद्युत वितरण कंपनी व खनिज तेल कंपनी यांच्याशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

हेही वाचा-शेअर बाजारात १६२ अंशाची घसरण; इराण-अमेरिकेतील तणावाचा परिणाम

हिरो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाल यांची योजनेवर टीका
वाहन निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या हिरो इलेकट्रिक कंपनीने फेम-२ योजनेतील ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या प्रोत्साहन देण्यात अपयशी ठरल्याची टीकाही हिरो इलेक्ट्रिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाल यांनी नुकतेच केली आहे.

हेही वाचा-दिल्ली-एनसीआरमध्ये सुरू होणार इलेक्ट्रिक चार्जिंगचे ३०० स्टेशन, केंद्रीय उर्जा विभागाचा पुढाकार

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.