नाशिक - कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाने कांद्याच्या भावात सुधारणा होणार असल्याने मनमाडच्या शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. सरकारने निर्यातीचे शुल्क माफ करावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
केंद्र सरकारने कांदे निर्यात बंदी हटविण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना व व्यापारी यांना मोठा फायदा होणार आहे. निर्यात शुल्क माफ केल्याने शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळू शकेल, असे मत शेतकरी व बाजार समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. निर्यात बंदी रद्द केल्याने कांद्याच्या भावात सरासरीहून 250 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. कांदे निर्यात शुल्क माफ केल्यास अजून चांगला भाव मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा-चिनी स्मार्टफोन कंपनी वापरणार इस्रोचे 'हे' तंत्रज्ञान
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करत कांद्यावर असलेली निर्यातबंदी उठवण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी निर्यात बंदी रद्द करण्यात आली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आनंदित आहेत. कांदा निर्यात बंदी कायस्वरूपी उठवण्याची शेतकरीवर्गातून मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, वर्ष २०१८ मध्ये दुष्काळ व वर्ष २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागले आहे.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकात २०० अंशांची पडझड; आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये घसरण