नवी दिल्ली - गुगलने अॅपल स्मार्टवॉचला टक्कर देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गुगल स्मार्टवॉच वीअर ओएस आणि सॅमसंगच्या टिझेन हे एकाच प्लॅटफॉर्मवर येणार आहेत. त्यामुळे वेगवान कामगिरी, दीर्घकाळ बॅटरी आणि स्मार्टवॉचमध्ये अधिक अॅप उपलब्ध असणार आहेत.
सॅमसंगच्या टीझेन ओएस आणि गुगल स्मार्टवॉच एकत्रित आल्याने गुगल स्मार्टवॉच वीअरवरील अॅप हे ३० टक्के वेगाने चालणार आहेत. तसेच स्मार्टवॉचमध्ये अगदी अलीकडील चिपसेट्स, वापरकर्त्यांसाठी आकर्षक अॅनिमेशन्स असणार आहेत.
हेही वाचा-अदानी ग्रुप 'ही' कंपनी २५,५०० कोटी रुपयांना करणार खरेदी
बॅटरीचे आयुष्य वाढणार-
विअर गुगल स्मार्टवॉचचे संचालक ब्जॉर्न किलबर्न म्हणाले, की दीर्घकाळ बॅटरी चालण्यासाटी आम्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर काम केले आहे. तर अत्याधुनिक कमी उर्जा लागणाऱ्या हार्डवेअरचा वापर केला आहे. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढणार आहे.
हेही वाचा-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाकरिता १ लाख डोस मिळण्याची विप्रोला अपेक्षा
- स्मार्टवॉचमध्ये हे करण्यात आले बदल-
वापरकर्त्यांना कोणती माहिती पाहिजे, हे एकाच दृष्टीक्षेपातून निवडू शकणार आहेत. - स्मार्टवॉचमधील गुगल मॅप्स आणि गुगल असिस्टंटची संरचना आणि विकास यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
- गुगल पेमध्ये नव्याने बदल करण्यात आल्याने हे अॅप २६ देशांमध्ये चालू शकणार आहे.
- युट्यूब म्युझिक हे लवकरच उपलब्ध होणार आहे.
- गुगलने स्मार्टवॉचमध्ये फिटबीटचे फीचर दिले आहेत. त्यामधून आरोग्याच्या प्रगतीबाबत नोंदी ठेवण्याच्या सुविधा आहेत.