नवी दिल्ली- 'गुगल पे' या गुगल कंपनीच्या अॅपमध्ये तांत्रिक त्रुटी निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक वापरकर्त्यांचे 'गुगल पे' खाते हे बँक खात्याशी संलग्न दिसत नव्हते. त्यामुळे अनेक वापरकर्त्यांना आर्थिक व्यवहारात अडथळा येत आहे.
'गुगल पे'च्या सेवेत त्रुटी आल्याचे काही वापरकर्त्यांनी ट्विट केले आहे. वापरकर्त्याच्या माहितीनुसार त्यांचे खाते हे संलग्न बँक खात्यावरून काढण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पैसे पाठविताना अडथळे येत आहेत. 'गुगल पे' खाते पुन्हा बँकेशी जोडताना केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचा पर्याय येत आहे. त्यामुळे वापरकर्ते गोंधळात पडल्याचे दिसून येत आहे. काही वापरकर्त्यांनी 'गुगल पे' अॅप मोबाईलमध्य अनइन्स्टॉल काढून परत इन्स्टॉल केले. तरीही त्यांच्या त्रुटीचे निवारण झालेले नाही.
हेही वाचा-'एलआयसीच्या विमाधारकांचे हितसंरक्षण करण्यात येईल'
गेल्या वर्षी 'गुगल पे'ची सेवा सुरू झाली आहे. या अॅपचे देशात सध्या ६७ दशलक्ष वापरकर्ते आहेत. युनिफाईड पेमेंटवर आधारित डिजिटल व्यवहार वाढण्यासाठी गुगल पेने मोठे योगदान दिले आहे.