ETV Bharat / business

ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या आयातीत गतवर्षाच्या तुलनेत 36 टक्क्यांनी वाढ - लेटेस्ट व्यापार न्यूज

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास, यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारताने 2.50 अब्ज डॉलर्स किंमतीच्या सोन्याची आयात केली. गेल्या वर्षी याच महिन्यात भारताने 1.84 अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात केली होती. यंदाच्या ऑक्टोबरमधील आयात 35.86 टक्क्यांनी जास्त आहे.

भारत सोने आयात न्यूज
भारत सोने आयात न्यूज
author img

By

Published : Nov 15, 2020, 5:47 PM IST

नवी दिल्ली - गतवर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात भारताने सुमारे 36 टक्क्यांनी अधिक सोन्याची आयात केली आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षाचा विचार केल्यास पहिल्या सात महिन्यांत देशात सोन्याच्या आयातीमध्ये मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 47 टक्क्यांनी घट झाली आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास, यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारताने 2.50 अब्ज डॉलर्स किंमतीच्या सोन्याची आयात केली. गेल्या वर्षी याच महिन्यात भारताने 1.84 अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात केली होती. यंदाच्या ऑक्टोबरमधील आयात 35.86 टक्क्यांनी जास्त आहे.

हेही वाचा - धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरातील नागरिकांनी खरेदी केले 20 हजार कोटींचे सोने - आयबीजेए

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या चांगल्या खरेदीच्या आशेवर गेल्या महिन्यात सोन्याची आयात वाढल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मात्र, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांमध्ये म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत भारताने केवळ 9.27 अब्ज डॉलर्सच्या सोन्याची आयात केली. ही मागील वर्षाच्या याच कालावधीतील 17.64 अब्ज डॉलरच्या सोन्याच्या आयातीच्या मूल्यापेक्षा 47.44 टक्के कमी आहे.

आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये चांदीची आयात 90.5 लाख डॉलर्सची होती. ही मागील वर्षीच्या तुलनेत 90.54 टक्क्यांनी कमी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सात महिन्यांत 74.26 कोटी डॉलर्स किंमतीची चांदी आयात करण्यात आली. ही मागील वर्षीच्या याच कालावधी आयात केलेल्या चांदीपेक्षा 64.65 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी याच काळात भारताने 2.10 अब्ज डॉलर्स किमतीच्या चांदीची आयात केली होती.

हेही वाचा - चिनी वस्तूंवर बहिष्कारानंतर दिवाळीत 72 हजार कोटींची उलाढाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.