ETV Bharat / business

तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलची दरवाढ; परभणी, इंदूरसह विविध शहरांमध्ये शतकपार

author img

By

Published : May 12, 2021, 3:52 PM IST

Updated : May 12, 2021, 4:24 PM IST

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने देशात किमतीने नवा उच्चाकं गाठला आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९२.०५ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ८२.६१ रुपये किंमत आहे.

पेट्रोल डिझेल दर न्यूज
पेट्रोल डिझेल दर न्यूज

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर २५ पैशांनी वाढल्या आहेत. आठवडाभरात सलग तिसऱ्यांदा इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोलच्या किमतीने भोपाळ आणि इंदूरसह विविध शहरांमध्ये १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने देशात किमतीने नवा उच्चाकं गाठला आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९२.०५ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ८२.६१ रुपये किंमत आहे.

हेही वाचा-व्हॉट्सअपच्या अटी स्वीकारल्या नाही तर, १५ मेनंतर मिळणार मर्यादित सेवा

  • सरकारी तेल कंपन्यांनी आठवड्यात सलग तिसऱ्यांदा आणि ४ मेपासून सातव्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्यात आले आहेत.
  • राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रमध्ये पेट्रोलच्या दराने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक होती. पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०० रुपयांहून असलेली भोपाळ ही देशातील पहिली राजधानी ठरली आहे. तर इंदूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १००.१६ रुपये आहे.
  • देशात राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यात सर्वाधिक पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत. श्री गंगानगरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०२.९६ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ९५.३३ रुपये आहे. मार्चपासून पेट्रोलचे दर प्रति लिटर १.६६ रुपये तर डिझेलचे दर १.८८ रुपयांनी वाढले आहेत.
  • सरकारी तेल कंपन्यांनी १५ एप्रिलपासून पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. पश्चिम बंगालसह पाच राज्यांमधील निवडणुका पार पडत असताना जनतेमध्ये रोष उत्पन्न होऊ नये, याकरिता इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले असावे, असे म्हटले जात आहे.
  • २७ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर इंधनाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे.
  • जगात जर्मनी आणि भारतात परभणी' या उक्ती प्रमाणे पुन्हा एकदा परभणी पेट्रोलच्या रेकॉर्डब्रेक किंमतीमुळे चर्चेत आली आहे. परभणी शहरात बुधवारी पावर पेट्रोल तब्बल १०४ रुपये ११ पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर साधे पेट्रोलदेखील शंभरीच्या (१००.७० पैसे) वर गेले आहे. जिह्यातील भारत पेट्रोलियमच्या पंपाना ३३० किमी दूर असलेल्या मनमाड डेपोतून इंधन पुरवठा होतो. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा दरवेळी परभणीकरांना मोठा फटका बसतो.

केंद्र सरकार व राज्य सरकारकडून इंधनावर भरमसाठ कर-

  • पेट्रोलच्या विक्री दरापैकी ६० टक्के किंमत ही केंद्र आणि राज्य सरकारच्या करावर अवलंबून असते. केंद्र सरकारचा पेट्रोलवर प्रति लिटर ३२.९० उत्पादन शुल्क तर डिझेलवर ३१.८० रुपये उत्पादन शुल्क लागू होते.
  • मुंबईत पेट्रोलचा दर बुधवारी प्रति लिटर ९८.१२ रुपयांवरून ९८.३६ रुपये झाला आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ८९.४८ रुपयांवरून ८९.७५ रुपये झाला आहे.

हेही वाचा-पुण्यात देशातील पहिले चाईल्ड कोविड केअर सेंटर सुरू करणार - महापौर मुरलीधर मोहोळ

Last Updated : May 12, 2021, 4:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.