नवी दिल्ली - अन्न नियमन एफएसएसएआयने हवाबंद पाणी बॉटलवर माहिती देण्यासाठी कंपन्यांना १ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कंपन्यांना पाणी बॉटलवर कॅल्शियम आणि मॅग्निशियमची माहिती देण्यासाठी अवधी मिळणार आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणेने हवाबंद पाणी बॉटलवर माहिती देण्यासाठी यापूर्वी १ जानेवारी २०२०१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. कोरोनाच्या काळात फुड बिझनेस ऑपरेटर्सची तयारी झाली नाही. त्यामुळे त्यांनी मुदतवाढ करण्याची विनंती केल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे. त्यामुळे कंपन्यांना पिण्याच्या बॉटलवर कॅल्शियम आणि मॅग्निशयमची माहिती देण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे.
हेही वाचा-रिलायन्स इंडस्ट्रीजसह मुकेश अंबानी यांना सेबीकडून ४० कोटींचा दंड
केंद्र सरकारने अन्न उत्पादन मानक नियमात २०१९ मध्ये बदल केला आहे. त्यामुळे पिण्याच्या बॉटलवर त्यामध्ये असलेले क्षारसह इतर सविस्तर माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा- खान्देशात डिसेंबर अखेरपर्यंत ९ लाख गाठींची खरेदी
दरम्यान, कोरोनाच्या काळात उद्योग व व्यवसायांसह पुरवठा साखळी विस्कळित झाली होती. त्यामुळे अनेक उद्योगांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे. पॅकिंग केलेल्या अन्नपदार्थांवर माहिती देणे कंपन्यांना बंधनकारक आहे. मात्र, पाणी बॉटलसाठी आजपर्यंत ठोस नियम लागू करण्यात आले नव्हते.