नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य आणि स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांची मोठी मागणी वाढली आहे. यामध्ये हँडवॉश, डिसइन्फेक्टंट स्प्रे आणि जर्म प्रोटेक्शन वाईप्सचा समावेश आहे.
गेल्या दोन महिन्यात ग्राहकांकडून स्वच्छता व आरोग्य उत्पादनांचा कमी वापर झाला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती बदलली आहे. आयटीसी, हिमालय ड्रग कंपनी आणि पतंजली कंपनीसह इतर एफएमसजीसी कंपन्यांनी मागणीची पुर्तता करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढली आहे. कंपन्यांनी सध्याच्या स्थितीचा आढावा घेत उत्पादनाचे नियोजन केले आहे. मागणीच्या प्रमाणात उत्पादन वाढविण्यासाठी कंपनीकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
हेही वाचा-बीड : स्वाराती रुग्णालयात 6 जणांचा मृत्यू; नातेवाईकांच्या आरोपांचे रुग्णालय प्रशासनाकडून खंडण
मागणीची पूर्तता करण्याचे प्रयत्न-
आयटीसीचे विभागीय चिफ एक्झ्युटिव्ह (पर्सनल केअर प्रोडक्ट्स) समीर सत्पाथी म्हणाले, की स्वच्छता उत्पादनांची मागणी वाढल्याचे दिसत आहे. पुरवठा साखळी बळकट करून मागणीची पूर्तता करण्याची करण्यात येत आहे. मागील वर्षात पहिल्या चार महिन्यात मद्यनिर्मिती, पेंट आणि बिगर एफएमसीजी कंपन्यांनीही सॅनिटायझरसारखी उत्पादने घेतली होती.
हेही वाचा-कोरोना वॉर्डात मोठ्याने बोलू नका म्हणणाऱ्या डॉक्टरावर नातेवाईकाचा हल्ला