नवी दिल्ली - जर सतत सूचना देऊनही प्रवाशाने व्यवस्थित मास्क घातला नाही तर, त्याला विमानातून उतरविले जाऊ शकते. जर वारंवार इशारा देऊनही मास्क घालण्यात येत नसेल तर उद्धट म्हणून अशा प्रवाशांची गणना होणार आहे. अशा प्रवाशांवर संबंधित विमान कंपन्यांकडून कारवाई होऊ शकते, असे डीजीसीआयने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
विमान प्रवाशांकडून कोरोनाच्या काळातील नियमांचे उल्लंघन होत असल्याने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए) कठोर निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास अशा प्रवाशांची उद्धट म्हणून नोंद घेतली जाणार असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.
हेही वाचा-चिंताजनक..! नागपुरात नवीन वर्षात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा मोठा
- विमानतळावर प्रवाशांकडून कोरोनाच्या काळातील नियमांचे उल्लंघन होत असल्याची वारंवार तक्रार करण्यात येते. याची गांभीर्याने दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नियम न पाळणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- प्रवाशांना विमानात आणि विमानतळाच्या परिसरात नेहमी मास्क घातला पाहिजे. तसेच अंतर बाळगले पाहिजे. विना मास्क कोणीही विमानतळावर प्रवेश करू नये, यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावर नियुक्त केले जाणार आहे.
- देशभरात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने कोरोनाच्या काळातील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
- केवळ अपवादात्मक स्थितीतच नाकाच्या खाली मास्क घ्यावा, असेही डीजीसीएने म्हटले आहे.
हेही वाचा-मुंबई : कंगनासह चार जणांवर पुन्हा गुन्हा दाखल, वाचा...