बंगळुरू - सणानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांनी भरघोस सवलती देणारे सेल जाहीर केले आहेत. फ्लिपकार्टचा 'द बिग बिलियन डेज' हा सेल रविवारपासून (२० ऑक्टोबर) सुरू होत आहे. यामध्ये ८० प्रकारच्या वर्गवारीतील सुमारे १५ कोटी उत्पादने विक्रीला ठेवण्यात येणार आहेत.
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये १ लाख नाममुद्रा (ब्रँड) असणार आहेत. तर १ लाखांहून अधिक विक्रेते त्यांची उत्पादने पहिल्यांदाच फ्लिपकार्टवर विक्री करणार आहेत. हे विक्रेते २ हजारहून अधिक मोठ्या व लहान शहरांमधील आहेत. तर १.३५ लाख कारागीरांच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री करण्यात येणार आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात खरेदी करण्याचा पर्याय देण्यासाठी फ्लिपकार्टने विविध वित्तीय संस्थांशी भागीदारीचा करार केला आहे.
हेही वाचा-सरकारी कंपन्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत पुरवठादारासह कंत्राटदारांची सर्व थकित रक्कम द्यावी - अर्थमंत्री