ETV Bharat / business

फ्लिपकार्टकडून पाच दिवसांच्या सेलमध्ये १ कोटी वस्तू घरोपोहोच!

फ्लिपकार्टवरून विक्री करणाऱ्या कोट्याधीश विक्रेत्यांच्या संख्येत १.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर विक्री करणाऱ्या लक्षाधीश विक्रेत्यांच्या संख्येत १.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

फ्लिपकार्ट
फ्लिपकार्ट
author img

By

Published : Oct 22, 2020, 5:38 PM IST

बंगळुरू- 'बिग बिलियन डे' या सवलतीच्या ५ दिवसांमध्ये फ्लिपकार्टने व्यवसायाचा यंदा नवा विक्रम केला आहे. फ्लिपकार्टने १ कोटी वस्तू ग्राहकांना घरपोहोच दिल्या आहेत. गतवर्षी केवळ १० लाख वस्तू ग्राहकांना बिग बिलियन डेमध्ये देण्यात आल्या होत्या, असे कंपनीने म्हटले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत फ्लिपकार्टवरून 'बिग बिलियन डे' ला मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर काही श्रेणींच्या खरेदीमध्ये ११० टक्क्यांची वाढ झाली आहे. एमएसएमईच्या उत्पादनांची खरेदी ही श्रेणी-३ आणि त्याहून अधिक श्रेणीच्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. किराणा भागीदारांकडून १ कोटी डिलिव्हरी या पाच दिवसांत ग्राहकांना घरपोहोच देण्यात आल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे. विक्री करणाऱ्या कोट्याधीश विक्रेत्यांच्या संख्येत १.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर विक्री करणाऱ्या लक्षाधीश विक्रेत्यांच्या संख्येत १.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मोबाईलच्या खरेदीत दुप्पट वाढ झाली आहे. तर प्रिमियम स्मार्टफोनच्या खरेदीचे प्रमाण हे ३.२ टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये अपल, गुगल आणि सॅमसंग फोनचा अधिक समावेश असल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.