बंगळुरू - देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांनी त्यांचा मालकीचे कंपनीचे ५४ लाख शेअर वॉलमार्टला विकले आहेत. या शेअरची किंमत ७६.४ दशलक्ष डॉलर (५३१ कोटी रुपये ) एवढी आहे.
बिन्नी यांचे शेअर वॉलमार्टची उपकंपनी एलक्सेमबर्गने विकत घेतले आहेत. वॉलमार्टने ५ लाख ३९ हजार ९१२ शेअर खरेदी करून फ्लिपकार्टमधील हिस्सा वाढविल्याचे चेन्नईच्या पेपर व्हीसीने म्हटले आहे. ही संस्था वित्तीय डाटा कंपनी आहे.
दोघा भावांनी विकले आहेत शेअर-
फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन व बिन्नी बन्सल या दोघा भावांनी आपले शेअर वॉलमार्टला विकले आहेत. यापूर्वीच सचिन यांनी वॉलमार्टला ७७ टक्के हिस्सा विकला आहे. त्यासाठी वॉलमार्टने सचिन यांना १६ अब्ज डॉलर दिले आहेत. त्यानंतर बिन्नी यांनी व्यवस्थापनाच्या टीमचे नेतृत्व केले आहे.
बिन्नी यांच्यावर गैरवर्तणूक केल्याचा महिलेने केला होता आरोप-
वैयक्तीक गैरवर्तणूक केल्याचा एका महिलेने आरोप केल्यानंतर वॉलमार्टने बिन्नी यांची चौकशी केली होती. त्यापूर्वी बिन्नी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. वॉलमार्टकडून फ्लिपकार्टमध्ये भागीदारी घेतली जात असताना बिन्नी यांनी ११ लाख २२ हजार ४३३ शेअर विकले होते. बिन्नी यांचा फ्लिपकार्टमध्ये ३.८५ टक्के हिसा होता. शेअर विकल्याने त्यात ०.३३ टक्क्यांची घट होवून ३.५२ टक्के एवढा झाला आहे.
फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडे असलेल्या आकडेवारीच्या तुलनेत या आकडेवारीत काही फरक असू शकतो, असे पेपर व्हीने म्हटले आहे.