ETV Bharat / business

टिकटॉकला अमेरिकन न्यायालयाकडून तूर्तास दिलासा; बंदी पुढे ढकलली

भारतानंतर अमेरिकेतही टिकटॉकवर बंदी लागू होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्याने टिकटॉकला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

टिकटॉक
टिकटॉक
author img

By

Published : Sep 28, 2020, 2:22 PM IST

न्यूयॉर्क - बंदीची टांगती तलवार असलेल्या टिकटॉकला अखेर अमेरिकेतील न्यायायाधीशांनी दिलासा दिला आहे. टिकटॉकवर आज मध्यरात्रीपासून लागू होणारी बंदी पुढे ढकलण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी लागू करण्याचे आदेश काढले होते.

कोलंबियाचे अमेरिकन न्यायालयाचे न्यायाधीश कार्ल निकोलस यांनी टिकटॉकवर बंदी लागू करण्यासाठी संमती दर्शविली नाही. त्यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पाडल्यानंतर आठवभरानंतर नोव्हेंबरमध्ये टिकटॉकवर बंदी लागू होणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेश वापरून टिकटॉकवर बंदी लागू करण्याचे आदेश दिले होते. टिकटॉकमुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असून नागरिकांची माहिती गोपनीय राहत नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यावर टिकटॉकने न्यायालयात धाव घेऊन ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. टिकटॉकच्या याचिकेवर न्यायालयाने रविवारी सकाळी तातडीने सुनावणी घेण्यात आली.

हेही वाचा-'शाश्वत वाहतुकीसाठी पर्यायी इंधन' : केंद्र सरकारने जाहीर केली नियमावली

ट्रम्प प्रशासनाच्या आदेशामुळे प्राथमिक अधिकार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा टिकटॉकच्यावतीने बाजू मांडणाऱ्या वकिलाने न्यायालयात केला. तसेच, ट्रम्प प्रशासनामुळे उद्योगांची कधीही न भरून निघणारी हानी होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा-जागतिक पर्यटन दिन २०२०: भविष्याबाबत पुनर्विचार करण्याची संधी

टिकटॉकची मालकी असलेल्या बाईटडान्सने ओरॅकल या सॉफ्टवेअर कंपनी आणि वॉलमार्टबरोबर भागीदारी केली आहे. टिकटॉकला अमेरिकेतील व्यवसाय टिकविण्यासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे. टिकटॉकवरील बंदी तात्पुरती रद्द केल्याबाबतचे मत न्यायायधीश निकोलस यांनी जाहीर केले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.