नवी दिल्ली - चिनी स्मार्टफोन कंनपी व्हिवोने वाय 73 हा नवीन स्मार्टफोन भारतीय वापरकर्त्यांसाठी लाँच केला आहे. या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत 20,990 रुपये किंमत आहे.
वाय 73 मध्ये मीडियाटेक हेलिओ जी 95 प्रोसेसर आहे. तर 8 जीबी रॅम पेअर्ड आहे. 12 जीबी इंटर्नल स्टोअरेज आहे. त्याचा 1 टीबीपर्यंत विस्तार होऊ शकतो. स्मार्टफोन हा अँड्राईड 11 वर फनटच ओएस 11.1 च्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.
हेही वाचा-कॅनरा बँकेतील विलिनीकरणानंतर सिंडिकेट बँकेच्या शाखांचे बदलणार आयएफसी कोड
ही आहेत वैशिष्ट्ये-
- व्हिवो वाय 73 म्हणजे ग्राहकांना आनंद देण्यासाठी एक पाऊल पुढे आहे.
- अल्ट्रा स्लिम डिझाईन, सुपरियर कॅमेरा, वेगाने चार्जिंग होण्याची क्षमता अशी वैशिष्ट्ये असल्याचे व्हिवो ब्रँड स्ट्रॅटजीचे संचालक निपूण मार्या यांनी सांगितले.
- स्मार्टफोनमध्ये 16.37 सेंमी एएमओएलईडी डिस्प्लेसह एफएचडी अल्ट्रा हायरिझोल्यूशन आहे. त्यामुळे ग्राहकांना व्हिडिओ व फोटोंचा अद्वितीय अनुभव घेणे शक्य होते.
- 64 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरासह स्पोर्ट्स ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 2 मेगापिक्सेलचा बोकेह सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. त्यामध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
- स्मार्टफोनमध्ये 4000एमएएचची दणकट बॅटरी आहे. ही बॅटरी 33 वॅटने वेगवान चार्जिंग होते. हा स्मार्टफोन डायमंड फ्लेअर आणि रोमन ब्लॅकमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.
हेही वाचा-टाळेबंदीचा फटका : प्रवासी वाहनांच्या विक्रीत 66 टक्के घसरण