ETV Bharat / business

मायक्रोमॅक्सचा आयएन १ लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये - स्मार्टफोन नवीन लाँच न्यूज

४जीबी+६४जीबी मूल्य असलेल्या स्मार्टफोनचे स्वागत मूल्य ९,९९९ रुपये आहे. तर ६जीबी+१२८जीबी श्रेणीतील स्मार्टफोनची किंमत ११,४९९ रुपये आहे. हे स्मार्टफोन जांभळ्या आणि निळ्या रंगामध्ये उपलब्ध आहेत.

Micromax IN 1
मायक्रोमॅक्स आयएन १
author img

By

Published : Mar 20, 2021, 3:00 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने उत्पादनावर आधारित सवलत देण्याची योजना जाहीर केल्यानंतर देशामधील स्मार्टफोनच्या निर्मितीला चालना मिळत आहे. देशातील स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने आयएन १ हा परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना दोन श्रेणीमध्ये उपलब्ध होणार आहे.

४जीबी+६४जीबी मूल्य असलेल्या स्मार्टफोनचे स्वागत मूल्य ९,९९९ रुपये आहे. तर ६जीबी+१२८जीबी श्रेणीतील स्मार्टफोनची किंमत ११,४९९ रुपये आहे. हे स्मार्टफोन जांभळ्या आणि निळ्या रंगामध्ये उपलब्ध आहेत.

मायक्रोमॅक्सचा आयएन १ लाँच

हेही वाचा-विमान प्रवास महागणार; तिकिटावरील किमान दराची अट ५ टक्क्यांनी शिथील

द आयएन १ या स्मार्टफोनची प्रेरणा भारतीय सुपरहिट सिनेमापासून घेण्यात आली आहे. त्यामध्ये चांगल्या दर्जाचे तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना आनंददायी आणि सुरक्षित अनुभव घेता येणे शक्य असल्याचे मायक्रोमॅक्स इंडियाचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी सांगितले.

Micromax IN 1
मायक्रोमॅक्सआयएन १

मायक्रोमॅक्स आयएन १ ची ही आहेत वैशिष्ट्ये

  • द आयएन १ मध्ये ६.६७ इंच फुल एचडी + पंच होल डिस्पले आहे.
  • स्पोर्ट्स ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तर ४८ मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे.
  • स्मार्टफोनमध्ये उच्च दर्जाचे पिक्सेल स्पष्टता असलेला ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.
  • इंटर्नल स्टोरेज विस्तारून जास्तीत जास्त २५६ जीबी क्षमता आहे.
  • ५००० एमएएच बॅटरी क्षमता आहे.
  • प्रोससर ते डिस्पले, कॅमेरा ते बॅटरी या सर्व वैशिष्ट्यासाठी खूप मेहनत केल्याची शर्मा यांनी सांगितले.
  • हा स्मार्टफोन मायक्रोमॅक्सइन्फो आणि फ्लिपकार्टवर २६ मार्चला दुपारी १२ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा-टीसीएसकडून कोरोना महामारीतही कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनवाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.