ETV Bharat / business

उपहासात्मक मजकूर असेल तर फेसबुक 'हा' घेणार निर्णय - Facebook laebling for satire pages

फेसबुकवरील पेज कशासंदर्भात आहे, हे वापरकर्त्यांना लवकर समजण्यासाठी कंपनीने यापूर्वीच महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानंतर कंपनीने अमेरिकेतील वापरकर्त्यांसाठी काही प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे.

Facebook  satire pages
फेसबुक न्यूज
author img

By

Published : Apr 9, 2021, 3:03 PM IST

सॅनफ्रान्सिस्को - काही वापरकर्ते उपहासात्मक मजकूर (कंटेन्ट) देत असतात. अशा स्थितीत खोट्या बातम्यांचा प्रसार थांबविताना फेसबुकचा कमालीचा गोंधळ उडत आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुकने उपहासात्मक (सटाईर) मजकुरावर थेट सटाईर असे लेबलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुकवरील पेज कशासंदर्भात आहे, हे वापरकर्त्यांना लवकर समजण्यासाठी कंपनीने यापूर्वीच महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानंतर कंपनीने अमेरिकेतील वापरकर्त्यांसाठी काही प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा-मुकेश अंबानी सेबीच्या दंडाविरोधात दाखल करणार अपील

जेव्हा वापरकर्ते न्यूज फीड पाहत असतात, तेव्हा त्यावर सार्वजनिक सरकारी किंवा फॅन पेज, सटाईर पेज दाखविण्यास सुरुवात केल्याचे फेसबुकने म्हटले आहे. त्यामुळे आपण काय पाहत आहोत, हे वापरकर्त्यांना अधिक चांगले समजू शकेल, असे कंपनीने म्हटले आहे. हे लेबलिंग का केले जात आहे, याबाबत कंपनीने अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. मात्र, कुणालाही सहज कळू शकते की, फेसबुक हा निर्णय का घेत आहे!

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा 182 रुपयांची वाढ

एका वृत्तानुसार फेसबुकला न्यूजफीडमधील पोस्टमागे असलेली पार्श्वभूमी अधिक स्पष्ट करायची आहे. त्यासाठी पोस्टवर लेबलिंग केले जात आहे. गतवर्षी फेसबुकने जूनमध्ये काही पोस्ट या सरकारच्या अंशत: अथवा पूर्णपणे संपादकीय नियंत्रणाखाली असल्याचे लेबलिंग करण्यास सुरुवात केली होती. यावर फेसबुकने स्पष्टीकरणही दिले होते. काही बातम्या या सरकारच्या प्रभावाखाली असू शकतात. याबाबत लोकांना माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे काही पोस्टवर लेबलिंग करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते.

दरम्यान, फेसबुकवरील पेजवर असलेले मेम्स अनेकदा राजकीय टीकांमुळे चर्चेत येत असतात. असे मेम्सही यापुढे सटाईर या लेबलने येत्या काळात दिसणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.