ETV Bharat / business

पीएफ खात्यावर ८.५ टक्क्यांचे व्याज १ तारखेपासून होणार जमा - पीएफ व्याजदर न्यूज

ईपीएफओच्या अनेक खातेदारांना भविष्यनिर्वाह निधीचे व्याज हे शुक्रवारपासून मिळणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वीच कामगार मंत्रालयाने पीएफचे ८.५ टक्के व्याज जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

ईपीएफओ
ईपीएफओ
author img

By

Published : Dec 31, 2020, 8:18 PM IST

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) २०१९-२० साठी ८.५ टक्के व्याज दिले आहे. हे व्याज सहा कोटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर शुक्रवारपासून मिळणार आहे.

ईपीएफओच्या अनेक खातेदारांना भविष्यनिर्वाह निधीचे व्याज हे शुक्रवारपासून मिळणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वीच कामगार मंत्रालयाने पीएफचे ८.५ टक्के व्याज जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ईपीएफओने मागील आर्थिक वर्षाती रकमेवरील व्याज देण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार म्हणाले की, २०१९-२२ साठी पीएफवर ८.५ टक्के व्याजदर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही अधिसूचना काढली आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'या' राज्यांमध्ये असणार 'नाईट कर्फ्यू'

जे खातेदार ३१ डिसेंबरला निवृत्त होणार आहेत, त्यांनाही ८.५ टक्के व्याज मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ईपीएफओने ईटीएफच्या गुंतवणुकीमधील हिस्सा विकण्याचे जाहीर केले आहे.

९४.४१ लाख कोटी दावे एप्रिल ते ऑगस्टमध्ये मंजूर

कोरोना महामारीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. ईपीएफओने एप्रिल ते ऑगस्टमध्ये ३५ हजार ४४५ कोटी रुपयांचे ९४.४१ लाख कोटी दावे मंजूर केल्याची माहिती कामगार मंत्रालयाने दिली. चालू वर्षात एप्रिल ते ऑगस्टमध्ये ईपीएफओचे दावे मंजूर करण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी वाढले आहे. गतवर्षीच्या एप्रिल ते ऑगस्टच्या तुलनेत यंदा १३ टक्के अधिक रकमेचे वितरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटात आर्थिक संकटात सापडलेल्या सदस्यांना आगाऊ रक्कम आणि आजारासंबंधी दाव्यासाठी रक्कम वेगाने देण्यात आल्याचे ईपीएफओने म्हटले आहे.

हेही वाचा-महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात ३,५०९ नवीन रुग्णांचे निदान, ५८ रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.