ETV Bharat / business

एन 95 चे निर्जंतुकीकरण करण्यासाठी 'ही' आहे सर्वात सोपी पद्धत

इलेक्ट्रिक कुकरच्या वापरातून एन 95 मास्क सॅनिटाईज करण्याबाबतचे संशोधन हे इन्व्हायरमेन्टल सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेटर्समध्ये प्रसिद्ध झाले आहे. इलेक्ट्रिक कुकरमध्ये एन 95 मास्कला दोन्ही बाजुंनी 50 मिनिटे कोरडी उष्णता दिल्यास तो पुन्हा वापरणे शक्य आहे.

author img

By

Published : Aug 8, 2020, 7:29 PM IST

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

न्यूयॉर्क – इलेक्ट्रिक मल्टीकुकरचा कोरोनाच्या महामारीत नवा फायदा समोर आला आहे. कोरोनाच्या लढ्यात संरक्षणासाठी महत्त्वाचा असलेल्या एन 95 मास्क हे मल्टीकुकरने निर्जंतुकीकरण करणे शक्य असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. मल्टीकुकरमधून मास्क निर्जंतुकीकरण केल्याने सुरक्षित आणि वापरण्यास योग्य असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

इलेक्ट्रिक कुकरच्या वापरातून एन 95 मास्क सॅनिटाईज करण्याबाबतचे संशोधन हे इन्व्हायरमेन्टल सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेटर्समध्ये प्रसिद्ध झाले आहे. इलेक्ट्रिक कुकरमध्ये एन 95 मास्कला दोन्ही बाजुंनी 50 मिनिटे कोरडी उष्णता दिल्यास तो पुन्हा वापरणे शक्य आहे. याबातची माहिती देताना अमेरिकेतील इसियन्स विद्यापीठाचे संशोधक विशाल वर्मा म्हणाले, की एन 95 मास्क हे निर्जंतुकीकरणाचे अनेक पर्याय आहेत. मात्र, बहुतांश पद्धतींमधून त्यांच्या फिल्टरेशन नष्ट होते. त्यामुळे एन 95 मधून सुरक्षित असा श्वास घेणे शक्य होत नाही.

चेहऱ्यावर पुन्हा मास्क व्यवस्थित बसणे, निर्जंतुकीकरण करणे, फिल्टरेशन व्यवस्थित राहणे या तीन निकषांचा विचार करण्यात आला. त्यामध्ये इलेक्ट्रिक कुकरचा उपयोग फायदेशीर ठरल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे त्यासाठी कोणतीही तयारी अथवा रसायनांचा वापर करावा लागला नाही.

कोरोना महामारीत अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना एन 95 ची कमतरता भासते. एन 95 हा एकवेळच वापरणे शक्य आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कुकरचा वापर करणे योग्य असल्याचा संशोधकांनी दावा केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.