नवी दिल्ली - सक्त अंमलबजावणी संचालनालयाने आयसीआयसीआय बँकेच्या माजी चेअरमन चंदा कोचर व इतरांची ७८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्त अंमलबजावणी संचालनालयाने मालमत्ता जप्तीची नोटीस चंदा कोचर यांना पाठविली आहे. यामध्ये कोचर यांचे मुंबईमधील घर आणि त्यांच्या कंपनीशी संबंधित मालमत्तेचा समावेश आहे.
ईडीकडून चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची मनी लाँड्रिग व आर्थिक अनियमिततेप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला १ हजार ८७५ कोटींचे कर्ज दिले होते. त्यामध्ये चंदा कोचर यांनी गैरप्रकार केल्याचा ईडीला संशय आहे. हे कर्ज व्हिडिओकॉन ग्रुपला २००९ आणि २०११ मध्ये देण्यात आले होते.
हेही वाचा-चंदा कोचर प्रकरणी 16 डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे आरबीआयला आदेश
व्हिडिओकॉन ग्रुपचे वेणुगोपाल धूत यांचीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी चौकशी केली आहे. व्हिडिओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेने २०१७ अखेर एकूण ४० हजार कोटींचे कर्ज दिले. त्यापैकी २ हजार ८१० कोटींचे कर्ज हे अनुत्पादित कर्ज (एनपीए) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
हेही वाचा-प्रवासी वाहनांच्या विक्रीत डिसेंबरमध्ये १.२४ टक्क्यांची घसरण