ETV Bharat / business

लॉक डाऊन : ई-कॉमर्स कंपन्यांचे अंशत: कामकाज सुरू, डिलिव्हरी मिळायला होणार उशीर - ई कॉमर्स कंपन्या

सोशल मीडिया कंपनी लोकल सर्कलच्या सर्व्हेक्षणानुसार २५ मार्च ते २६ मार्चदरम्यान १७७ जिल्ह्यांमध्ये ६१ लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळू शकल्या नाहीत.

ई-कॉमर्स
ई-कॉमर्स
author img

By

Published : Mar 27, 2020, 9:00 PM IST

नवी दिल्ली - काही ई-कॉमर्स कंपन्यांनी आज किराणा सामानासह जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीसाठी अंशत: कामकाज सुरू केले आहे. मात्र, ग्राहकांना डिलिव्हरी मिळण्याला उशीर लागेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संचारबंदी लागू असल्याने लॉक डाऊनमध्ये पास मिळण्यासाठी काही आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांनी विविध जिल्हा प्रशासनांशी संपर्क साधला आहे. लॉकडाऊनमधून ई-कॉमर्स कंपन्यांना वगळण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी पोलिसांनी ई-कॉमर्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना अडविल्याचे प्रकार घडले आहेत. तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना दंडही ठोठावला आहे.

हेही वाचा-जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित राहण्यासाठी सरकारने घेतली ई-कॉमर्स कंपन्यांची बैठक

फ्लिपकार्टने काळाबाजार रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तुंच्या ऑर्डर घेणे थांबविले आहे. तर अॅमेझॉन इंडियात जीवनावश्यक वस्तुंच्या ऑर्डर घेतल्या जात आहेत. मात्र, डिलिव्हरी थांबविलेली आहे. सोशल मीडिया कंपनी लोकल सर्कलच्या सर्वेक्षणानुसार २५ मार्च ते २६ मार्चदरम्यान १७७ जिल्ह्यांमध्ये ६१ लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळू शकल्या नाहीत.

हेही वाचा-बीएस-४ वाहनांच्या विक्रीत ३१ मार्चहून १० एप्रिलपर्यंत दिवसांची वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.