नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने पॅन कार्ड हे आधारला जोडणे बंधनकारक केले आहे. ज्या नागरिकांनी दोन्ही कार्डची जोडणी (लिंक) केली नाही, त्यांनी ३१ मार्च ही अंतिम मुदत चुकवू नये, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.
जर आधारला पॅन कार्ड जोडणी नसेल तर, पॅन कार्ड सुरू राहणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारीतच स्पष्ट केले आहे. पॅन आणि आणि आधार जोडणी ३१ मार्च २०२० पर्यंत करणे बंधनकारक आहे. हे तुम्ही बायोमेट्रिक आधार पडताळणीने करू शकता. तसेच एनएसडीएल आणि युटीआयटीएसएलच्या पॅन सेवा केंद्रातूनही जोडणी करणे शक्य असल्याचे प्राप्तिकर विभागाने समाज माध्यमातील पोस्टमध्ये म्हटले आहे. अशी जोडणी भविष्यासाठी फायद्याचे असल्याचेही प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.
हेही वाचा-एजीआरचे सर्व शुल्क भरल्याचा व्होडाफोन आयडियाचा दावा
अशी करा पॅनची आधारला जोडणी
- ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर UIDPAN<स्पेस>१२ अंकी आधार क्रमांक><स्पेस>१० अंकी पॅन क्रमांक> असा संदेश पाठवा.
- www.incometaxindiaefiling.gov.in. या ई-फायलिंग वेबसाईटवरूनही जोडणी करू शकता.
गेल्यावर्षी ३० डिसेंबरला प्राप्तिकर विभागाने पॅन-आधारची जोडणी करण्यासाठी आठव्यांदा मुदतवाढ दिली होती.
हेही वाचा- महामारीचा आर्थिक फटका : गुंतवणूकदारांनी गमाविले ६.२५ लाख कोटी!