ETV Bharat / business

कोव्हॅक्सिन पुरवठ्याच्या हेतूबाबत काही राज्यांनी तक्रारी करणे हे खूप निराशाजनक-भारत बायोटेक

भारत बायोटकेचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इल्ला यांनी ट्विट करत कोव्हॅक्सिनच्या पुरवठ्याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने यापूर्वीच १० मे रोजी कोव्हॅक्सिन पाठविल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

भारत बायोटेक
भारत बायोटेक
author img

By

Published : May 12, 2021, 7:54 PM IST

नवी दिल्ली - भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनचा जाणीवपूर्वक पुरवठा होत नसल्याची काही राज्यांकडून तक्रार ऐकायला मिळत आहे. हे खूप निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया भारत बायोटेकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

भारत बायोटकेचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इल्ला यांनी ट्विट करत कोव्हॅक्सिनच्या पुरवठ्याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने यापूर्वीच १० मे रोजी कोव्हॅक्सिन पाठविल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

सुचित्रा इल्ला यांचे ट्विट
सुचित्रा इल्ला यांचे ट्विट

एकाच शिपमेंटमधून १८ राज्यांना लस देण्यात आली आहे. काही राज्ये आमच्या हेतूबद्दल तक्रार करत असण्याचे ऐकणे हे आमच्या टीमसाठी खूप निराशाजनक आहे. आम्ही महामारीत केवळ तुमच्यासाठी २४x७ दिवस काम करत आहोत, असे सुचित्रा इल्ला यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलची दरवाढ; परभणी, इंदूरसह विविध शहरांमध्ये शतकपार

या राज्यांना करण्यात आला लशींचा पुरवठा

आंध्र प्रदेश, हरियाणा, ओडिशा, आसाम, जम्मू आणि काश्मीर, तामिळनाडू, बिहार, झारखंड आणि दिल्ली या राज्यांना १० मे रोजी पुरवठा करण्यात आला आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगाणा, त्रिपुरा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांनाही कोव्हिक्सिनचा पुरवठा करण्यात आला आहे.

लस पुरवठ्यावर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याचाचा दिल्ली सरकारचा आरोप

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, की दिल्लीमधील कोव्हॅक्सिनचे डोस संपले आहेत. त्यामुळे १०० लसीकरण केंद्रापैकी शाळेत सुरू करण्यात आलेले १७ लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहेत. कोव्हॅक्सिन उत्पादक कंपनीने पत्रात म्हटले की, केंद्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार लस उपलब्ध नसल्याने दिल्ली सरकारला आम्ही लस पुरवू सकत नाही. त्यावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी लसीकरणाचा पुरवठा केंद्र सरकार नियंत्रित केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने लशींची निर्यात थांबवावी, अशी मागणीही सिसोदिया यांनी केली. दोन्ही लस उत्पादक कंपन्यांच्या लशीचे फॉर्म्युला सामाईक (शेअर) करावे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात इत कंपन्यांकडून लशींचे उत्पादन घेण्यात येईल, असे सिसोदिया यांनी म्हटले.

हेही वाचा-भीमा कोरेगाव प्रकरण : सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज

कोव्हॅक्सिन ही एकमेव संपूर्ण स्वदेशी लस-

कोव्हॅक्सिन ही एकमेव संपूर्ण स्वदेशी असलेली कोरोना विरोधातील लस आहे. भारत बायोटेकने जानेवारीत नाकावाटे देण्यात येणाऱ्या बीबीव्ही१५४ ही लस विकसित सुरू असल्याचे जाहीर केले होते. सध्या कोव्हॅक्सिनचे उत्पादन हे हैदराबादमधील जिनोम व्हॅलीमधील बायोसेफ्टी लेव्हल -३(बीएसएल-३) मध्ये घेण्यात येत आहे. याशिवाय भारत बायोटेककडून बंगळुरूमधील सुविधांचा वापर करून कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.