मुंबई - ईडीच्या विशेष न्यायालयाने डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान यांची 27 मे रोजीपर्यंत कोठडी वाढविली आहे. वाधवान पिता-पुत्रावर मनी लाँड्रिगचा आरोप आहे. त्यांनी येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर आणि इतरांकडून कर्ज घेताना अनियमितपणा केल्याचा आरोप आहे.
कपील आणि धीरज वाधवान यांना शुक्रवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वाधवान यांची कोठडी वाढवून मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली. दोघेही आरोपी चौकशीत सहकार्य करत नाहीत. त्यांच्याविरोधात भरपूर कागदोपत्री पुरावे असल्याचे ईडीने कोठडीची मागणी करताना न्यायालयात सांगितले.
हेही वाचा-अनिल अंबानींना इंग्लंडच्या न्यायालयाचा दणका; 71.7 कोटी डॉलर बँकेला देण्याचे आदेश
ईडीची मागणी मा्न्य करत न्यायालयाने वाधवान यांची कोठडी २७ मे रोजीपर्यंत वाढविली आहे. टाळेबंदी असतानाही वाधवान हे महाबळेश्वरमध्ये गेल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सातारामध्ये काही दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर वाधवान यांची पुन्हा कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
हेही वाचा-कोरोनाशी 'भारतीय पोस्ट'चा लढा; २ हजार टन औषधांसह साधनांची डिलिव्हरी