ETV Bharat / business

आयसीएमआरने टेस्ट किट परत करण्याच्या निर्णयावर चीनने 'ही' दिली प्रतिक्रिया - Guangzhou Wondfo Biotech

आयसीएमआरने चीनमधून आयात केल्या टेस्ट किटचा वापर राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. या टेस्ट किट या चीनी कंपनी गुआनझहोवू वॉन्डफो बायोटेक आणि झुआई लिव्हझॉन डायनोग्स्टिक्स या चीनी कंपन्यांकडून आयात करण्यात आल्या होत्या. पण त्यांच्या टेस्ट किटचे परिणाम हे चुकीचे येत असल्याचे दिसून आले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Apr 28, 2020, 3:49 PM IST

नवी दिल्ली - भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (आयसीएमआर) चीनमधून आयात केलेल्या कोरोनाच्या टेस्ट किट परत करण्याच्या निर्णयावर चीनने अत्यंत चिंता व्यक्त केली आहे. हा प्रश्न भारत योग्य पद्धतीने सोडवेल, अशी आशा चीनने व्यक्त केली आहे.

आयसीएमआरने चीनमधून आयात केल्या टेस्ट किटचा वापर राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. या टेस्ट किट या चिनी कंपनी गुआनझहोवू वॉन्डफो बायोटेक आणि झुआई लिव्हझॉन डायनोग्स्टिक्स यांच्याकडून आयात करण्यात आल्या होत्या. पण त्यांच्या टेस्ट किटचे परिणाम हे चुकीचे येत असल्याचे दिसून आले आहे.

आयसीएमआरच्या परिणामाच्या मूल्यांकनाबाबत खूप चिंतेत असल्याची प्रतिक्रिया चीनच्या राजदूत कार्यालयाचे प्रवक्ते जी राँग यांनी दिली आहे. चीनने दर्जेदार आणि अत्यंत महत्त्वाची वैद्यकीय साधने भारताला केल्याचा त्यांनी दावा केला. काही वैयक्तिक लोकांच्या अयोग्य आणि बेजाबदारपणामुळे चीनची उत्पादने ही सदोष म्हणणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली.

हेही वाचा-कोरोनाची दुसरी लाट आली तर.. ४२ टक्के कंपन्यांचे शून्य नियोजन

काय आहे रॅपिड टेस्टचे प्रकरण-

भारताने चीनमधून सुमारे ५ लाख रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट पंधरा दिवसापूर्वी मागविल्या आहेत. राजस्थानमध्ये या टेस्ट चुकीच्या येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आयसीएमआरने रॅपिड टेस्ट थांबविण्याच्या राज्यांना सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे चीनमधून आयात टेस्ट करणारी कंपनी व वितरण करणाऱ्या कंपनीमधील वादामुळे नफेखोरीचा प्रकारही समोर आला आहे. टेस्ट किटच्या वितरणातील किंमत ही आयातीच्या किमतीहून तिप्पट असल्याने काँग्रेसने कारवाईची मागणी केली होती. आयसीएमआरने ही खरेदी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. तसेच आगाऊ रक्कम कंपन्यांना दिली नसल्याचे सांगत एक रुपयाचेही सरकारचे नुकसान झाले नसल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

हेही वाचा-थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले 'मास्क'; जळगावातील विद्यार्थ्यांचा अविष्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.