ETV Bharat / business

चिनी लॉन अॅप कंपन्यांविरोधात ईडीची कारवाई; ७६.६७ कोटींची मालमत्ता जप्त - property seized by ED

कर्जदाराने पैसे थकविले तर त्याचा मोबाईल क्रमांक, फोटो हा सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायलर करण्याची धमकीही कंपन्यांकडून दिली जात होती. हा व्यवसाय आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करून करण्यात येत होता. त्यामुळे ईडीने इन्संट लोन अॅप देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ईडी
ईडी
author img

By

Published : May 12, 2021, 10:27 PM IST

बंगळुरू - सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑनलाईन कर्ज देणाऱ्या ७ कंपन्यांची मालमत्ता जप्त केली आहे. लोकांची फसवणूक केलेल्या चिनी अॅपशी या कंपन्यांचा संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.

सीआयडीने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीकडून ऑनलाईन कर्ज देणाऱ्या इन्स्टंट अॅप कंपन्यांची चौकशी सुरू आहे. या तपासादरम्यान ७६.६७ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा-ऐन महामारीत खाद्यतेलासह एलपीजीच्या महागाईचा 'भडका'; दोन वर्षात किमती दुप्पट

या कंपन्यांवर कारवाई-

मॅड एलेफंट नेटवर्क टेक्नॉलॉजी, बॅरोनिक्स टेक्नो प्रा, क्लाउट अॅटलास फ्युचर टेक्नो या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांवर चिनी नागरिकांचे नियंत्रण असल्याचे ईडीला तपासात आढळले आहे. एक्स १० फायनान्शियल सर्व्हिसेस, ट्रॅक फाईन प्रा. लि., जमनादास मोरारजी फायनान्स प्रा या कंपन्या बिगर बँकिंग कंपन्या म्हणून सूचिबद्ध आहेत.

हेही वाचा-तिसऱ्या लाटेतील मुलांना धोका : कोव्हॅक्सिनची २ ते १८ वयोगटाकरता होणार चाचणी

अशा प्रकारे कंपन्या कर्जदारांची करत होते फसवणूक

कर्ज देणाऱ्या कंपन्यांचे एजंट हे कर्जदारांना वसुली करता छळत असल्याचे समोर आले होते. तसेच कर्जदारांना सेवाशुल्क, व्याज आणि चक्रवाढ व्याज असे विविध शुल्क लागू करण्यात येत होते. कंपन्या कर्जदारांकडून खंडणी वसुली करत असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासादरम्यान निष्पन्न झाले. कर्जदाराने पैसे थकविले तर त्याचा मोबाईल क्रमांक, फोटो हा सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायलर करण्याची धमकीही कंपन्यांकडून दिली जात होती. हा व्यवसाय आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करून करण्यात येत होता. त्यामुळे ईडीने इन्संट लोन अॅप देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सपाठोपाठ मारुती व टोयोटोकडून वॉरंटीत वाढ

त्रासामुळे तरुणाने केली होती आत्महत्या

तामिळनाडूमध्ये या कंपनीच्या त्रासामुळे तरुणाने आत्महत्या केली होती. या प्रकरणात ७ चिनी कंपन्यांचा समावेश असल्याचे ईडीला आढळले. त्यामुळे ईडीने कंपन्यांविरोधात ही कारवाई केली आहे. ईडीने सातही कंपन्यांची मालमत्ता जप्त करत ऑफिस बंद केले आहे. तेलंगाणा पोलीस आणि सायबर युनिटने चिनी नागरिकांविरोधात मनी लाँड्रिग प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.

कर्ज देणाऱ्या कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात हैदराबाद पोलिसमध्ये २७ आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. त्याबाबत अधिक माहिती घेतली जात असल्याचेही ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.