सॅन फ्रान्सिस्को - ओपन वर्ल्ड रोल प्लेइंग गेमची स्टेडियम आवृत्ती, सायबरपंक 2077, 19 नोव्हेंबरला लाँच होईल, असे पोलंडमधील व्हिडिओ गेम डेव्हलपर कंपनी सीडी प्रोजेक्ट रेडने सांगितले आहे.
याच दिवशी कंपनी आपला पीसी, पीएस 4 आणि एक्सबॉक्स 1 बाजारात आणत आहे. कंपनीने एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली.
हेही वाचा - सॅमसंगने किफायतशीर ए-42 5जी स्मार्टफोनचे केले लाँचिंग
सायबरपंक 2077 हा सायबरपंकच्या फ्रँचायझीमधून घेण्यात आला आहे. ऑगस्ट 2019 मध्ये हा गेम स्टडियावर येईल, असे गूगलने सांगितले होते. पण तारीख निश्चित केली नव्हती.
हा खेळ 16 एप्रिलला इतर प्लॅटफॉर्मवर सुरू होणार होता. परंतु कोरोनामुळे याचे लाँचिंग दोनदा रद्द करण्यात आले होते.
हेही वाचा - अॅपलकडून आयफोन - १२ सीरीजचे अनावरण