ETV Bharat / business

टाटाकडून मोलाची मदत; १५० कोटींच्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

author img

By

Published : Apr 16, 2020, 7:58 PM IST

अत्यंत तातडीची गरज असलेल्या ठिकाणी विविध वैद्यकीय साहित्य पोहोचविले जाणार असल्याचे टाटा ट्रस्टने म्हटले आहे. यामध्ये मास्क, पीपीई किट, एन ९५ आणि केएन ९५ मास्क आदींचा समावेश आहे.

संग्रहित - पीपीई
संग्रहित - पीपीई

नवी दिल्ली - टाटा ट्रस्टने पीपीई किट, सर्जिकल मास्क आणि ग्लोजसारखे महत्त्वाचे वैद्यकीय साहित्य एअरलिफ्ट करून देशाच्या विविध भागात पोहोचविले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी टाटा ट्रस्टने टाटा इंटरनॅशनलच्या सहाय्याने हे मदतकार्य आज केले आहे.

अत्यंत तातडीची गरज असलेल्या ठिकाणी विविध वैद्यकीय साहित्य पोहोचविले जाणार असल्याचे टाटा ट्रस्टने म्हटले आहे. यामध्ये मास्क, पीपीई किट, एन ९५ आणि केएन ९५ मास्क आदींचा समावेश आहे. टाटा ट्रस्टने एकूण १५० कोटी रुपयांचे वैद्यकीय साहित्य देण्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा-'अर्थव्यवस्था मोठ्या संकटाला सामोरे जाताना सरकारने तयार राहावे'

कोरोना हे आजपर्यंतचे मानवावरील सर्वात मोठे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी आपत्कालीन संसाधने ही पोहोचवावीत, असे आवाहन टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांनी केले होते. कोरोनाच्या लढ्यासाठी टाटा ट्रस्ट आणि टाटा ग्रुपने १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.

हेही वाचा-भारतीय चलनाचे विक्रमी अवमूल्यन : डॉलरच्या तुलनेत मोजावे लागणार ७६.८२ रुपये!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.