नवी दिल्ली - कोरोनाने विमान कंपन्यांवर आर्थिक संकट घोंगावत आहे. यावर मात करण्यासाठी सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने कर्मचाऱ्यांचे भत्ते १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केबिन क्रूमध्ये काम करणाऱ्यांचे भत्ते कमी करण्यात येणार नाहीत.
एअर इंडियामधील कर्मचाऱ्यांचे भत्ते मार्च २०२० पासून कमी होणार आहेत. या भत्त्याचा किमान वेतन, घरभत्त्यावर आदींवर परिणाम होणार नाही. कोरोनाचे अनेक रुग्ण विदेशातून येत असताना देशात त्याचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
हेही वाचा-कोरोनाचा ताण:आरबीआय ३० हजार कोटींचे खरेदी करणार सरकारी रोखे
कोविड-१९ या महामारीचा विमान वाहतूक उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. संकटावर मात करण्यासाठी सर्व विमान कंपन्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खर्चात कपात करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. त्यामधून सध्याच्या वित्तीय संकटाचा परिणाम कमी होण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.
हेही वाचा-बीएसएनएलची धमाकेदार ऑफर, तुम्ही म्हणाल घरी बसूनच काम करेन....
भत्ते कपात करण्याचा निर्णय हा आपतकालीन कार्यकारी व्यवस्थापन समितीने १८ मार्च २०२० ला घेतला आहे. खर्चात कपात करण्यासाठी एअर इंडियाने हॉटेलसह इतरांचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, गो एअर इंडियाने नुकतेच वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.