मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पीएम- केअर्सला ७.३० कोटी रुपयांचे योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या लोकांसाठी वापरण्यात येणार आहे.
कोरोनाच्या लढ्यात मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम केअर्स या नावाने पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केली आहे. या ट्रस्टच्या बँक खात्यावर विविध सरकारी बँका, उद्योजक, सेलिब्रिटी आणि इतर लोक मदतनिधी जमा करत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून ७.३० कोटी रुपयांची मदत पीएम केअर्सला देण्यात येणार आहे.
हेही वाचा-आयसीएमआरने टेस्ट किट परत करण्याच्या निर्णयावर चीनने 'ही' दिली प्रतिक्रिया
कोरोनाच्या महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. हातावर पोट असलेले स्थलांतरि मजूर असे गरीब लोक अडचणीत आले आहेत. टाळेबंदीत उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने त्यांच्यासाठी केंद्र सरकार अन्न सुरक्षा योजनेसारख्या माध्यमातून मदत करत आहे.
हेही वाचा-कोरोनाविरोधातील लढ्यात कोका कोला करणार 'इतकी' तुफानी मदत