नवी दिल्ली - कोरोनाचा परिणाम झाल्याने बांधकाम प्रकल्पांची कामे व घरे विक्री ठप्प झाल्याचे स्थावर मालमत्ता उद्योगाची संस्था क्रेडाईने म्हटले आहे. विकसकांना थकित पैसे भरण्यासाठी तात्पुरती तीन महिन्यांची मुदत द्यावी, अतिरिक्त वित्तपुरवठा करावा व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ द्यावा, अशी मागणी क्रेडाईने सरकारकडे केली आहे.
क्रेडाईने गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीप पुरी यांना पत्र लिहून मदत करण्यासाठी पॅकेजची मागणी केली आहे. कोरोनाने भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रावर होत असलेल्या परिणामांची संघटनेने पत्रात माहिती दिली आहे.
हेही वाचा - वॉलमार्ट इंडियाच्या व्यवसायात वाढ; सॅनिटायझरच्या विक्रीवर घातली मर्यादा
स्थावर मालमत्ता खरेदी करणारे अनेकजण मासिक हप्ता वेळेवर भरत नाहीत. तसेच कोरोनाने अनेक दुकाने व मॉल बंद असल्याने त्यापासून मिळणाऱ्या भाड्याच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे क्रेडाईने म्हटले. बांधकामांना मिळणाऱ्या मालाला उशीर होत आहे. तसेच मजुरांकडून होणारी कामे विस्कळित झाली आहेत. अशा स्थितीत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी उशीर लागणार लागणार असल्याचे क्रेडाईने म्हटले आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वेळेची मर्यादा वाढवून द्यावी व त्यावर रेराकडून एक वर्षापर्यंत दंड होवू नये, अशी क्रेडाईने सरकारकडे मागणी केली आहे.
हेही वाचा - कोरोनाने रुपयाच्या 'आर्थिक' आरोग्यावर परिणाम; डॉ़लरच्या तुलनेत ७० पैशांनी घसरण