ETV Bharat / business

कोरोना : निर्यात ठप्प झाल्याने दररोज १५ हजार क्विंटल केळी पडून - जळगाव केळी व्यापारी

जगासह देशात कोरोना थैमान घालत असल्याने केंद्र व राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. याचा परिणाम जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असलेल्या केळी व्यवसायावर झाला आहे.

Corona Effect on Banana Export
केळी निर्यातीवर कोरोना परिणाम
author img

By

Published : Mar 17, 2020, 6:43 PM IST

Updated : Mar 18, 2020, 1:01 PM IST

जळगाव - कधी अस्मानी तर कधी सुलतानी त्यात कोरोना अशा तिहेरी संकटात जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सापडला आहे. जिल्ह्यातून परदेशात होणारी केळीची निर्यात गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १५ हजार क्विंटल केळी पडून आहे.

जगासह देशात कोरोना थैमान घालत असल्याने केंद्र व राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. याचा परिणाम जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असलेल्या केळी व्यवसायावर झाला आहे.

कोरोना विषाणू व आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या केळीमुळे जिल्ह्यातू होणाऱ्या केळी निर्यातीवर परिणाम झाला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने आयात होणारा माल देशाच्या सीमेवर १४ दिवस थांबविण्याचे आदेश तीन दिवसांपूर्वी दिले आहेत. हीच स्थिती सौदी राष्ट्रांमध्येही असल्याने केळीची निर्यात थांबण्याचे सूत्रांनी सांगितले.

निर्यात ठप्प झाल्याने दररोज १५ हजार क्विंटल केळी पडून

हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाळूत डोके खुपसले, राहुल गांधींची टीका

नवती व पिलबागांमधील केळी मोठ्या प्रमाणावर कापणी योग्य अवस्थेत आहे. मात्र कोरोना विषाणूमुळे परदेशातील व देशातील उत्तरेकडील राज्यातील व्यापाऱ्यांकडून होणारी मागणी घटल्याने केळीची कापणी होत नाही. बागांमध्ये कापणी अभावी केळी साठण्याचे प्रमाण वाढत आहे.

हेही वाचा-'COVID 19'चा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही - अनुराग ठाकूर

वाहतुकीत ५० टक्के घट-

जळगाव जिल्ह्यातून उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर, बिहार, राजस्थान, पंजाब, हरियाणा व इतर राज्यात ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून या राज्यातील व्यापाऱ्यांकडून केळीची मागणी घटल्याने वाहतुकीत ५० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. दररोज १५० ट्रक केळीची वाहतूक होणे अपेक्षित असताना गेल्या पंधरा दिवसांपासून केवळ ५० ते ६० ट्रक केळी रवाना होत आहे.

केळीची ठेला विक्री बंद -

परराज्यातील दिल्ली, लुधियाना, पानिपत, कर्नाल यासह अनेक मोठ्या शहरातून स्थानिक व्यावसायिक ठिकठिकाणी ठेले लावून केळीची किरकोळ विक्री करतात. मात्र गेल्या आठवड्यापासून अनेक शहरात फळ विक्री करणारे ठेले लावण्यास स्थानिक प्रशासनाने बंदी घातल्याने परराज्यातून होणाऱ्या केळीच्या मागणीत घट झाली आहे.

Last Updated : Mar 18, 2020, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.