बंगळुरू - देशामध्ये नोकऱ्यांचे प्रमाण ऑगस्टमध्ये गतवर्षीप्रमाणे वाढून १२ टक्के झाले आहे. मात्र, नोकऱ्यांमधील स्पर्धा ही गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढल्याचे लिंक्डइन या व्यावसायिक नेटवर्क कंपनीने म्हटले आहे.
कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रातील नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. लिंक्डइनच्या आकडेवारीनुसार रिक्रिएशन आणि प्रवास, किरकोळ विक्री, कॉर्पोरेट सेवा या क्षेत्रातील लोक हे इतर क्षेत्रात नोकऱ्या शोधत आहेत.
असे आहे इतर क्षेत्रात नोकऱ्या शोधण्याचे प्रमाण-
- रिक्रिएशन आणि प्रवास - ३.८ टक्के
- किरकोळ विक्री- १.५ टक्के
- कॉर्पोरेट सेवा- १.४ टक्के
देशात पायथॉन (प्रोग्रॅमिंग लँग्वेज) हे सर्वात वेगाने कौशल्य आहे. त्यानंतर मशिन लर्निंग, डाटा स्ट्रक्चर, डिजीटल मार्केटिंग आणि एचटीएमएल ५ यांचा समावेश आहे.
लिंक्डइनमध्ये प्रत्येक मिनिटाला तीन जणांना मिळते नोकरी
लिंक्डइनमध्ये प्रत्येक मिनिटाला तीन जणांना नोकरी मिळते, असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी बुधवारी सांगितले. लिंक्डईनमध्ये नवीन संपर्क सोडण्यासाठी आणि कथा (स्टोरी) सामाईक करण्यासाठी नवीन फीचर सुरू करण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षात लिंक्डइनमध्ये खूप मोठे बदल झाले आहेत.