नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी स्टेट बँक देशात विस्तार करणार आहे. त्यासाठी सीएमएस इन्फो सिस्टिम्स स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३ हजार एटीएम मार्चपर्यंत सुरू करणार आहे.
स्टेट बँकेच्या एटीएमचे काम हे सीएमएस कंपनीकडून चालविण्यात येते. सीएमएसला ३ हजार एटीएम सुरू करण्याची परवानगी मिळाल्याचे कंपनीचे अध्यक्ष मंजुनाथ राव यांनी सांगितले. त्यामुळे सीएमएसकडे एकूण ५ हजार एटीएएस असणार आहे.
हेही वाचा-रिलायन्स इंडस्ट्रीजसह मुकेश अंबानी यांना सेबीकडून ४० कोटींचा दंड
२ हजार कर्मचाऱ्यांची कंपनी करणार नियुक्ती
नव्या एटीएमसाठी २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सीएमएस कंपनीने म्हटले आहे. तर २ हजार कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाणार असल्याचे सांगितले. एसबीआयने सीएमएसला सात वर्षांचे कंत्राट दिले आहे. हे कंत्राट संमतीने तीन वर्षांपर्यंत वाढू शकते. एटीएममधून होणाऱ्या व्यवहारांमधून हा व्यवसाय पुढील पाचवर्षापर्यंत नफ्यात येईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-लसीची किंमत सरकारसाठी २१९ ते २९२ रुपये-आदार पुनावाला
काय आहे सीएमएसची सुविधा?
सीएमएसमधून बँकेला एटीएमच्या व्यवस्थापनाची सेवा देण्यात येते. त्यामध्ये एजीएस ट्रान्स्टक्ट, एसआयएस व रायटर कॉर्प यांच्या सेवेचा समावेश आहे. दरम्यान, आरबीआयच्या आकडेवारीनुसार बँकिंग व्यवस्थेमध्ये १ लाख १३ हजार ९८१ एटीएम आहेत. कोरोनाच्या काळात बँकिंग व्यवस्थेवर मर्यादा आल्या असताना एटीएमच्या सुविधेमुळे नागरिकांना खात्यातून वेळीच पैसे मिळणे शक्य झाले होते.