ETV Bharat / business

रेमेडेसीवीर जगात सर्वात कमी किमतीत भारतात; 'या' कंपनीने केले लाँच - रेमेडेसीवीर औषध सिप्रेमी नावाने जेनेरिकमध्ये लाँच

सिप्लाकडून पहिल्या महिन्यात रेमेडेसीवीरच्या 80 हजार डोसचे उत्पादन घेण्यात येणार आहे. 100 मिलीग्रॅमच्या सिप्रेमीची किंमत 4 हजार रुपये आहे.

 रेमेडेसीवीर
रेमेडेसीवीर
author img

By

Published : Jul 9, 2020, 8:53 PM IST

नवी दिल्ली –सिप्ला कंपनीने विषाणू नियंत्रणात आणणारे रेमेडेसीवीर औषध हे सिप्रेमी या नावाने जेनेरिकमध्ये लाँच केले आहे. शंभर मिलीचे हे औषध 4 हजार रुपयांना आहे. सिप्लाच्या रेमेडेसीवीर औषधाची जगात सर्वात कमी किंमत आहे.

सिप्लाकडून पहिल्या महिन्यात रेमेडेसीवीरच्या 80 हजार डोसांचे उत्पादन घेण्यात येणार आहे. 100 मिलीग्रॅमच्या सिप्रेमीची किंमत 4 हजार रुपये आहे. सिप्लाचे उपाध्यक्ष निखील चोप्रा म्हणाले, की आम्हाला सिप्रेमी हे औषध लाँच करताना आनंद वाटत आहे.

औषधाचा पुरेसा पुरवठा होण्याकरता केवळ सरकार आणि रुग्णालयासाठी रेमेडेसीवीर उपलब्ध करण्यात येणार आहे. औषधामधील काही रक्कम ही गरजेच्या काळात समाजाला उपयुक्त ठरण्यासाठी वितरित करण्यात येणार असल्याचे चोप्रा यांनी सांगितले.

सिप्रेमीला औषधी नियंत्रण महासंचालनालयाने काही वैद्यकीय अटीवर परवानगी दिली आहे. यापूर्वी रेमेडेसीवीरची किंमत मायलॅन एनव्ही कंपनीने 4,800 तर हेटेरोने 5,400 रुपये किंमत जाहीर केली आहे.

रेमेडिसीवीरचा उपयोग गंभीर असलेल्या कोरोना बाधित रुग्णावरील उपचार करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.