नवी दिल्ली - मुंबईमधील वीजपुरवठा बंद पडण्यामागे चीनमधील हॅकर असल्याचे समोर येत असतानाच दुसरी धक्कादायक बाब समोर आली आहे. रशिया आणि चीनशी संबंधित असलेल्या हॅकरने गेल्या काही आठवड्यात कोरोना लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला लक्ष्य केले होते. ही माहिती सायबर गुप्तचर संघटना सायफर्मा कंपनीने अहवालात दिली आहे.
हॅकिंग करणारी मोहिम ही उत्तर कोरियामधून चालविले जात असल्याचे सायफर्माने म्हटले आहे. हॅकिंग करणाऱ्या /e गटाने यापूर्वी योग गुरू रामदेव पतंजली ग्रुपला लक्ष्य केले होते. सिंगापूर आणि जपान येथील सायफर्माला गोल्डमॅन सॅच्स आणि झेड ३ पार्टनर या कंपन्यांचे समर्थन आहे. सायफर्माने नुकतेच औषधी कंपन्यांना निर्माण झालेल्या धोक्यावर अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा २४१ रुपयांची वाढ
काय म्हटले आहे अहवालात?
- सायबर हल्ले हे रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि मध्य पूर्वेसह १२ देशांमधून करण्यात आले आहेत. हे हल्ले भारतीय कोरोना लशीबाबतचे संशोधन, पेटंट माहिती, वैद्यकीय चाचण्यांची आकडेवारी आदी माहिती चोरण्यासाठी करण्यात आले होते.
- सायबर हल्ल्यांमध्ये भारत, अमेरिका, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया, स्पेन, इटली, जर्मनी, ब्राझील, तैवान आणि मेस्किको या देशांतील औषधी कंपन्यांचा समावेश आहे.
- सायफार्माच्या अहवालानुसार सायबर हल्ल्याच्या १५ मोहिमा अजूनही सुरू आहेत.
- आपण ज्या पद्धतीने काम करतो आहोत, त्यामध्ये मोठा बदल हा कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे आपण काम करण्यासह जगण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. आरोग्य क्षेत्रासह औषधी कंपन्या प्रकाशझोतात आल्या आहेत.
- जेव्हा जग पूर्वस्थितीला येण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा सायबर गुन्हेगार हे डार्क वेबचा वापर करून भीतीच्या वातावरणात फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे अहवालात म्हटले आहेत. सायबर हल्ल्याच्या मोहिमेमधून संवेदनशील वैयक्तिक माहिती चोरणे, ग्राहकांची माहिती चोरणे त्यामधून आर्थिक फायदा मिळविण्याचा हेतू असल्याचे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-एलपीजी गॅसमध्ये आणखी २५ रुपयांची दरवाढ; एका महिन्यांदा चौथ्यांदा महागाईचा चटका
राष्ट्रीय सायबर सुरक्षा रणनीती लवकर येण्याची शक्यता-
देशात सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असताना खूप काळ प्रतिक्षा असलेले राष्ट्रीय सायबर सुरक्षा रणनीती अस्तित्वात येऊ शकते. चीन सरकारचा पाठिंबा असलेल्या हॅकरने मुंबईमधील वीज कंपनीवर हल्ला झाल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. त्यामुळे देशाला सायबर सुरक्षेचे धोरण आणि रचना वेगाने आखण्याची गरज निर्माण झाली आहे. भारताचे राष्ट्रीय सायब सुरक्षा समन्वयक ले. जनरल राजेश पंत हे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले की, एनसीएसएस हे लवकरच अस्तित्वात येणार आहे. त्यामध्ये आपले संरक्षण कसे असणार आहे, यावर सर्व बाबी असणार आहेत. रणनीतीचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीवर ते अस्तित्वात येणे अवलंबून असणार आहेत. ते एक किंवा दोन महिन्यात अस्तित्वात येणे आवश्यक आहे, असे मत राजेश पंत यांनी व्यक्त केले.
मुंबईमधील वीज जाण्यामागेही सायबर हल्लेखोरांवर संशय-
12 ऑक्टोबर 2020 यादिवशी लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अचानक वीज गेल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली होती. मात्र, या ब्लॅक आउटमागे विशेष सायबर हल्ला झाल्याची शक्यता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्तवली आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. अमेरिकेच्या रेकॉर्डड फिचर अॅनॅलिसिस कंपनीचा अहवालानुसार, मुंबईत ब्लॅक आऊटमागे चीनचा संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सायबर विभागाकडूनही यासंदर्भात तपास सुरू आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. सायबर विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या साईटवर हल्ले झाले आहेत. मात्र, अद्याप हे हल्ले कोणाकडून करण्यात आले आहेत, यासंबधी गृह विभागाकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. या हल्ल्याचा तपास करताना महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या संकेतस्थळावर आठ जीबी अंकाउंटेड डेटा मिळाला आहे. हा सायबर हल्ल्यात वापरला गेला आल्याची शक्यता गृहमंत्र्यांकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, भारत बायोटेक व सीरम या दोन्ही कंपन्यांच्या लशीला आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.